जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक, सरकारकडे केली मागणी
अभिनेते अनुपम खेर यांनी महाराष्ट्र सरकारकडे रायगडमधील आपटा रेल्वे स्टेशन पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी केली आहे. हेच ते ठिकाण आहे, जिथे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) या गाजलेल्या चित्रपटाचा प्रसिद्ध शेवटचा सीन चित्रित करण्यात आला होता. या दृश्यामध्ये अमरीश पुरी “जा सिमरन जा…” म्हणत सिमरनचा हात सोडतात आणि त्यानंतर काजोल धावत जाऊन शाहरुख खान यांचा हात पकडते. हा सीन आजही भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आयकॉनिक दृश्यांपैकी एक मानला जातो.

दरम्यान, तब्बल 32 वर्षांनंतर अनुपम खेर पुन्हा त्याच ठिकाणी आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचले आहेत. अनेक वर्षांनी त्या लोकेशनवकार परतल्यानंतर ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “32 वर्षांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी शूटिंग करणं अत्यंत भावनिक अनुभव होता. त्या वेळी आम्हाला कल्पनाही नव्हती की, शाहरुख खान आणि काजोल यांचा तो क्षण भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिक दृश्यांपैकी एक ठरेल. आयुष्याची खरी सुंदरता कदाचित यातच आहे की, एखाद्या क्षणाचं महानत्व आपल्याला खूप उशिरा जाणवतं.”
Published on: May 11, 2026 04:47 PM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi