Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. FDA कडून दररोज करण्यात येणाऱ्या तपासणी आणि धाडसत्रामुळे मोठी हॉटेल्स, उपहारगृहे आणि रेस्टॉरंट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून आता लोकप्रिय फूड ब्रँड Domino's Pizzaच्या काही आउटलेट्सवरही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. FDA कडून दररोज करण्यात येणाऱ्या तपासणी आणि धाडसत्रामुळे मोठी हॉटेल्स, उपहारगृहे आणि रेस्टॉरंट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून आता लोकप्रिय फूड ब्रँड Domino’s Pizzaच्या काही आउटलेट्सवरही कारवाई करण्यात आली आहे.
FDA अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांचे उल्लंघन आढळून आल्याने Domino’s Pizza च्या पाच आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये मुंबईतील विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील तीन आउटलेट्सचा समावेश आहे. तसेच मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील Domino’s आउटलेट्सवरही कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व आउटलेट्स Jubilant FoodWorks अंतर्गत सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
विलेपार्ले पश्चिम येथील आउटलेटच्या तपासणीदरम्यान FDA अधिकाऱ्यांना अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. FSSAI परवाना योग्य पद्धतीने प्रदर्शित करण्यात आलेला नव्हता. याशिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नपदार्थांची साठवणूक, पेस्ट कंट्रोल आणि एकूणच स्वच्छतेबाबतही त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले.
तपासणीदरम्यान व्हेज आणि नॉन-व्हेज खाद्यपदार्थांसाठी एकच प्लॅटफॉर्म वापरला जात असल्याचेही आढळून आल्याची माहिती आहे. अन्नपदार्थांच्या वर्गीकरणासह स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना FDA कडून देण्यात आल्या आहेत.
याशिवाय फ्रोझन खाद्यपदार्थांच्या तापमानावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणे, खाद्यपदार्थांचे योग्य वर्गीकरण करणे, नियमित पेस्ट कंट्रोल करणे आणि स्वच्छता व्यवस्था काटेकोरपणे राखणे, अशा सूचना संबंधित आस्थापनांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे अन्न व्यवसायातील नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील काळातही राज्यभरातील फूड जॉइंट्सवर तपासणी आणि कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 13, 2026 08:56 AM
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...

