AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?

Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?

| Updated on: Aug 13, 2026 | 8:35 AM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाचे, याबाबत सुनावणी सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीला या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.

याशिवाय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्नही गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबतही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या दोन्ही पदांबाबत निर्णय होणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली करत शिंदे गटाच्या शिवसेनेला मान्यता दिल्याचा दावा त्यांनी न्यायालयासमोर केला.

कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यनेतेपदाच्या निवडीसह त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या घटनात्मक वैधतेवरही प्रश्न उपस्थित केल्याचा दावा करण्यात आला. पक्षाची संघटनात्मक रचना, विधिमंडळातील संख्याबळ आणि निवडणूक आयोगाचा निर्णय या मुद्द्यांवर त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

त्यामुळे एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचलेली असताना, दुसरीकडे शिंदे-फडणवीस यांची रात्री उशिराची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि आगामी काळात कोणते राजकीय निर्णय घेतले जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 13, 2026 08:35 AM

Follow Us