AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक

अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती…; सुनेत्रा पवार भावुक

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 08, 2026 | 11:29 AM
Share

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुनेत्रा पवार यांनी या उड्डाणपुलामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल असे सांगितले. त्यांनी अजित पवारांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत पुणे शहराच्या विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पुणेकरांना या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल असे सांगितले. हा दिवस पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या, तसेच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

या उड्डाणपुलाच्या उभारणीत अजित पवारांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. जुना पूल पाडून आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा धाडसी निर्णय अजित पवारांनी घेतला. कोरोना काळातही त्यांनी या प्रकल्पावर बारकाईने लक्ष ठेवून काम वेगाने पूर्ण करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहराचा सर्वांगीण विकास आणि दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे हे आपले ध्येय असेल, असे सांगत त्यांनी अजित पवारांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Published on: Mar 08, 2026 11:28 AM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा