AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....

Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर….

| Updated on: Nov 09, 2026 | 9:27 AM
Share

मुंबईची हवा दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. फटाक्यांच्या अतिवापरामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अनेक ठिकाणी 260 च्या पुढे गेला आहे. दादर, खेरवाडी, बीकेसीसारख्या भागांमध्ये हवा अत्यंत खराब नोंदवली गेली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवेचा दर्जा लक्षणीयरित्या खालावला आहे. दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 171 वर पोहोचला आहे, तर वांद्र्यातील खेरवाडी येथे हाच निर्देशांक 264 वर गेला आहे.

केवळ खेरवाडीच नव्हे, तर बीकेसीमध्ये 231, देवनारमध्ये 226 आणि घाटकोपरमध्ये 221 असा AQI नोंदवला गेला आहे, ज्यामुळे शहराच्या अनेक भागांतील हवा अत्यंत खराब श्रेणीत मोडते. यापूर्वी गेल्या आठवड्यात हा निर्देशांक 151 ते 160 च्या दरम्यान होता. फटाक्यांच्या वापरामुळे प्रदूषणात झालेली ही अचानक वाढ चिंताजनक आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यावर काय उपाययोजना केल्या जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.

 

Published on: Nov 09, 2026 09:27 AM

Follow Us