AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने

Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने

| Updated on: Nov 09, 2026 | 10:08 AM
Share

मुंबईतील पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार ते नालासोपारा दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असून, फटाक्यांमुळे सिग्नल वायरिंग जळाल्याची माहिती आहे. यामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.

मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार ते नालासोपारा स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या रात्री वाजवलेल्या फटाक्यांमुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांची रॅकेट सिग्नल बॉक्समध्ये शिरल्याने त्यात आग लागली आणि सिग्नल वायरिंग जळून खाक झाली.

या बिघाडामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा जवळपास पंधरा ते तीस मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने या सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर नेहमीसारखी गर्दी नसली तरी, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र या विलंबाचा मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

 

 

Published on: Nov 09, 2026 10:08 AM

Follow Us