पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मुरलीधर मोहोळ यांची मागणी
पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मुरलीधर मोहोळ यांनी हा पूल अजित पवारांच्या संकल्पनेतून साकारल्याचे सांगितले. पवारांनी विकासात कधी राजकारण केले नाही, हे अधोरेखित करत या पुलाला त्यांचे नाव द्यावे अशी पुणेकरांची इच्छा असल्याचे मोहोळ यांनी व्यक्त केले. या प्रकल्पात देवेंद्र फडणवीस आणि पीएमआरडीएने गती आणली.
पुणे विद्यापीठ चौकातील महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी पुलाच्या निर्मितीमागे असलेले तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान अधोरेखित केले. मोहोळ यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीने हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला आहे. त्यामुळे या पुलाला अजित दादांचे नाव देण्यात यावे अशी पुणेकरांसह सर्वांची इच्छा आहे, असे मोहोळ यांनी म्हटले.
२०२० साली या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. अनेक अडथळे पार करत पीएमआरडीएच्या माध्यमातून २७७ कोटी रुपये खर्चून १७६३ मीटर लांबीचा हा अत्याधुनिक दुमजली उड्डाणपूल साकारला आहे. या प्रकल्पामुळे शिवाजीनगर, औंध, बाणेर, पाषाण भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल. पुणेकरांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मोहोळ यांनी त्यांचे आभार मानले.
Published on: Mar 08, 2026 11:47 AM
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
