शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंची नोटीस, थेट या अभिनेत्रीने केले काैतुक, म्हणाली, तुम्ही..
तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने व्हिडीओ शेअर करत तुकाराम मुंढे यांचे जोरदार काैतुक केले.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे सूत्र आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया सुरू आहेत. भेसळखोरांना सळो की पळो करून तुकाराम मुंढे यांनी सोडले. मोठंमोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये उंदरांचा वावर आणि घाण यानंतर थेट कारवाई केली जात आहे. दूध, पनीर आणि दह्यात किती जास्त भेगळ केली जात आहे हे देखील पुढे आले. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची फक्त राज्यातच नाही तर देशभरात चर्चा होत आहे. नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांचे काैतुक केले जात आहे. त्यातच तुकाराम मुंढे यांची बदली होणार असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. सरकारने जाहीर केले की, तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही. तुकाराम मुंढे यांच्या सतत बदल्या होतात.
त्यातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने तुकाराम मुंढे यांचे काैतुक केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध आणि कडक प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो आणि जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढतो, असे वक्तव्य मल्लिकाने यावेळी केले.
अन्नातील भेसळ आणि औषध व्यवसायातील अनियंत्रित प्रकारांवर तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्त म्हणून सुरू केलेल्या कडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर हे कौतुक करण्यात आले आहे. मल्लिका शेरावत म्हणाली, तुमच्यामुळे आता मी बिनधास्तपणे आणि शांतपणे जेवण खाऊ शकते. तुमचे कडक नियम आणि कार्यपद्धतीमुळे आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत, याची मला खात्री आहे.
तुमच्या नजरेतून काहीही सुटू शकत नाही. तुमचे खूप खूप आभार. आता अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना तुकाराम मुंढे यांच्याकडून विमल पान मसाल्यासाठी नोटीस पाठवण्यात आली.
