AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : 20 जूनला पाऊस विसरा, या तारखेला राज्यात धो धो पाऊस, थेट जुलै महिन्याच्या..

Monsoon Update : राज्यात मॉन्सून अद्याप दाखल झाला नाही. 19 जून उजाडला आहे. मात्र, मॉन्सूनच्या पावसाचा पत्ता नाही. त्यामध्येच आता मॉन्सूनबाबत अत्यंत मोठी अपडेट आहे. मॉन्सून जुलै महिन्यात राज्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. ही एक अत्यंत धोक्याची घंटा आहे.

Monsoon Update : 20 जूनला पाऊस विसरा, या तारखेला राज्यात धो धो पाऊस, थेट जुलै महिन्याच्या..
Monsoon Update
| Updated on: Jun 19, 2026 | 7:15 AM
Share

मुंबईसह राज्यात अजून मॉन्सूनच्या पावसाचा पत्ता नाही. सुरवातीला हा पाऊस 15 जूनला येणार असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर 20 जून तारीख सांगण्यात आली. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची अजिबात प्रगती अजिबात नाही. मॉन्सून पुढे वाटचाल करत नसल्याने संकट आहे. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. त्यात मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. राज्यात मॉन्सून दाखल होण्यासाठी 8 दिवसांची तरी वाट पाहावी लागणार आहे. काही हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, राज्यात मॉन्सूनचा पाऊस पूर्णपणे दाखल होण्यासाठी जुलै महिनाही उजाडू शकतो. राज्यात मॉन्सूनची स्थिती अत्यंत गंभीर आहे. पाणी पातळी सातत्याने खाली जात आहे. शेतकरी चिंतेत आहे. सतत मॉन्सूनची तारीख पुढे ढकलली जात आहे. पण प्रत्यक्षात पावसाची थांग पत्ता नाही. यादरम्यानच राज्यातील अनेक भागात उष्णता वाढत आहे. विदर्भात आज काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला.

मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला. जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. मॉन्सूनला पोषक वातावरण नसल्याने मॉन्सून एकाच जागी ठप्प आहे. राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता अजून काही दिवस लागणार आहेत. मॉन्सूनची स्थिती जैसे थेच आहे.

ओडिसा, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि तेलंगणा या काही भागात मॉन्सून सक्रिय झाला. राज्यात यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. सोलापूर, हरणई, भद्राचलम, हैद्राबाद, रांची, जमुई, कोरापुट या भागात मॉन्सूनची सीमा होती. पुढील 4 ते 5 दिवसात जर मॉन्सूनला पोषक वातावरण मिळाले तर पुढील वाटचाल अनुकूल राहू शकते.

जून महिन्याची 19 तारीख आली आहे, पण मॉन्सूनचा पाऊस अद्याप राज्यात दाखल झाला नाही. शिवाय प्रशांत महासागरात एल निनोचे संकट वेगळेच आहे. एल निनोमुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अजून पाऊसच झाला नाही. शेतकरी चिंतेत आहेत. 1 जुलैनंतर राज्यात मॉन्सून पूर्णपणे दाखल होण्याचा अंदाज आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी