धनंजय मुंडे
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेचे आमदार आहेत. त्यांचा जन्म 15 जुलै 1975 साली बीडमध्ये झाला. ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपनीथ मुंडे यांचे बंधु पंडित अण्णा मुंडे यांचे सुपूत्र आहेत. धनंजय मुंडे हे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. सख्खे काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पुढे राजकीय महत्त्वकांक्षेपोटी ते काकांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. 2019 साली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री बनले.
Read MoreNavnath Waghmare: तो तर मनोज जरांगे यांचा पाळलेला… खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करताना नवनाथ वाघमारे यांचा तोल सुटला
Navnath Waghmare on Bajrang Sonawane : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनाच अटक केली पाहिजे हेच यांचं टार्गेट होतं, असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 3, 2026
- 1:24 pm
धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलं निवदेन
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. ही भेट नेमकी कशामुळे याचे कारण सुरुवातीला समोर आले नव्हते. परंतु नंतर धनंजय मुंडे यांनी दुष्काळ निवारणासंदर्भात ही भेट घेतली होती, असे मुंडे यांच्याकडूनच सांगण्यात आले.
- Sunil Late
- Updated on: Oct 1, 2026
- 7:23 pm
पंकजा मुंडे पहिल्यांदाच धनंजय मुंडेंसोबतच्या नात्यावर स्पष्ट बोलल्या, थेट सुनेत्रा पावारांसमोरच मोठी घोषणा
परळीमध्ये पशुवैद्य व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ व भूमिपूजन सोहळा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला, या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 15, 2026
- 5:07 pm
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्… चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?
बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शासकीय बैठकीला महिला उपनगराध्यक्षांच्या ऐवजी त्यांच्या पतीने उपस्थिती लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे उपनगराध्यक्ष खान यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते देवराव लुगडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 8, 2026
- 4:10 pm
अरे, तुम्ही मला पाणीच… सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
काँग्रेसने 'गुंगी गुडिया' म्हणत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्वतःकडे राज्याचे अर्थखाते...
- प्रिती वेद
- Updated on: Aug 6, 2026
- 12:17 pm
Dhananjay Munde | गुंगी गुडियावरून राजकारण पेटलं!; धनंजय मुंडेंनी काँग्रेसला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या "गुंगी गुडिया" या टीकेवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेसने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी द्वेषातून अशी टीका केली असल्याचा आरोप करत, त्यांनी काँग्रेसला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Aug 4, 2026
- 2:41 pm
Dhananjay Munde: सगळ्यांना एकच व्यक्ती… आता मी जगावं की मरावं? धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ
Dhananjay Munde Sunetra Pawar: मुंडे बहीण-भाऊ गेल्या दोन दिवसांपासून राज्याचा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची व्यथा मांडली. त्यांनी भावनिक आवाहन केले. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून काँग्रेसचा समाचार घेतला. काय म्हणाले धनंजय मुंडे?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 4, 2026
- 2:35 pm
मराठ्यांसह सगळ्या जातींनी…धनंजय मुंडे यांच्या त्या विधानावर मनोज जरांगे संतापले; केली सडकून टीका!
त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राजकीय संन्यासावर भाष्य केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुंडे यांच्या याच विधाानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Aug 3, 2026
- 6:53 pm
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते निवृत्ती, मुंडे बहीण-भावांच्या विधानांनी चर्चांना उधाण; भात्यातून पुन्हा काढला नाराजीचा बाण
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विधानांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नापासून निवृत्तीच्या विचारांपर्यंत, पंकजाताईंची राजकीय खदखद समोर आली. तर धनंजय मुंडे यांनी घटलेल्या वजनाची चिंता व्यक्त करत पुन्हा उभारी घेण्याचे संकेत दिले. बीडमधील या राजकीय घडामोडींचे पडसाद राज्यभर उमटत आहेत, ज्यामुळे मुंडे कुटुंबातील वाढत्या नाराजीची चर्चा सुरू आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 3, 2026
- 6:06 pm
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी …
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना मुंडे यांनी राजकारणात राहावं की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 3, 2026
- 4:50 pm
जर दोघांना राजकारणातून एक्झिट पाहिजे असेल तर मी…, मुंडे भाऊ- बहिणीच्या निवृत्तीच्या संकेतावर करुणा मुंडेंचं मोठं वक्तव्य
आधी पंकजा मुंडे आणि आता धनंजय मुंडे यांनी निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे, राजकारणातून निवृत्त व्हावं वाटतं, असं पकंजा मुंडे यांनी रविवारी म्हटलं होतं, त्यावर आता करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 3, 2026
- 4:10 pm
Dhananjay Munde : मला वाटतंय की राजकारणात…धनंजय मुंडेंचं राजकीय संन्यासावर मोठं विधान, राजकीय वर्तुळात एकच खळबळ!
सध्या राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली आहे. मला राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतोय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांनी हे भाष्य केल्यानंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Aug 3, 2026
- 4:29 pm