AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navnath Waghmare: तो तर मनोज जरांगे यांचा पाळलेला… खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करताना नवनाथ वाघमारे यांचा तोल सुटला

Navnath Waghmare on Bajrang Sonawane : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनाच अटक केली पाहिजे हेच यांचं टार्गेट होतं, असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर केला.

Navnath Waghmare: तो तर मनोज जरांगे यांचा पाळलेला... खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करताना नवनाथ वाघमारे यांचा तोल सुटला
नवनाथ वाघमारे, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे
| Updated on: Oct 03, 2026 | 1:24 PM
Share

बीडचे राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर मोठा आरोप केला आहे. बीड जिल्ह्यातील विलास घुले खून प्रकरणात आपल्या मुलाला नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी त्यांनी काही जणांकडे अंगुली निर्देश करत आरोपांची राळ उडवून दिली. त्यांच्या आरोपानंतर आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

वाघमारे यांचा सोनवणे यांच्यावर हल्लाबोल

विलास घुले हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर आरोप केलाय, त्या आरोपावर नवनाथ वाघमारे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर चांगलाच पलटवार केला.500 काय 5 हजार कोटीचा दावा ठोक काय फरक पडतो? तुला किडन्या विकून देऊ असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय.इतकच नाही तर बजरंग सोनवणे हा मनोज जरांगे यांनी पाळलेला असून पुढचा पराभव दिसत असल्याने उलटी-सुल्टी वक्तव्य करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना अटक केली पाहिजे हेच टार्गेट यांचं होतं असं म्हणत बजरंग सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बजरंग सोनवणे यांचा आरोप काय?

बीडमधील विलास घुले हत्याप्रकरणात राजकीय वातावरण पुन्हा तापलं. काल पत्रकार परिषद घेत खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोप केले. वाल्मिक कराड याने तुरूंगातून आपल्या मुलाला अडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी एक ऑडिओ क्लिपही माध्यमांना ऐकवली. तर धनंजय मुंडे यांच्यासाठी आपण दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पाय धरल्याचेही सांगितले. या पत्रकार परिषदेतून त्यांनी काही ओबीसी नेत्यांवरही निशाणा साधला.

दरम्यान काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना ऊत आला होता. पण दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करण्यासाठी ही भेट घेतल्याचे समोर आले. नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळायला काही कालावधी लागेल. तोपर्यंत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून तातडीने मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

Follow Us
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...