AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरार स्पोटर्स क्लबच्या उद्धाघटनावरून राडा, भाजप-बविआमध्ये हायहोल्टेज ड्रामा,आमदार-खासदारांनी गेट तोडून…

Virar Sport Complex: विरारच्या क्रीडा संकुलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपा आमदार खासदारांनी गेट आणि बॅरिकेटिंग तोडून क्रीडा संकुलात जबरदस्तीने प्रवेश केल्यावरून एकच राडा झाला. आज भाजप आणि बविआ आमनेसामने आहे.

विरार स्पोटर्स क्लबच्या उद्धाघटनावरून राडा, भाजप-बविआमध्ये हायहोल्टेज ड्रामा,आमदार-खासदारांनी गेट तोडून...
भाजप-बविआमध्ये हायहोल्टेड ड्रामा
| Updated on: Oct 03, 2026 | 12:42 PM
Share

विजय गायकवाड, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: विरारच्या क्रीडा संकुलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपा आमदार खासदारांनी गेट आणि बॅरिकेटिंग तोडून क्रीडा संकुलात जबरदस्तीने प्रवेश केल्यावरून एकच राडा झाला. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त क्रीडा संकुलचे उद्घाटन ठेवले होते. त्याचवेळी भाजपाच्या खासदार आणि आमदाराचा हायहोल्टेज ड्रामा समोर आला. आज भाजप आणि बविआ आमनेसामने आले.

नेमका वाद काय?

वसई-विरार महानगरापालिकेने विरार पश्चिममधील बोळींज येथे क्रीडा संकुल आणि नालासोपारा येथील नाट्यगृहाचे उद्धघाटन ठेवले. या उद्धघाटनावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये तीव्र राजकीय वाद पेटला आहे. आज, 3 ऑक्टोबर रोजी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वास्तूंचे उद्धघाटन करण्यात येणार होते. बविआने त्यासाठी जय्यत तयारी केली होती. पण त्याला भाजपने कडाडून विरोध केला.

बॅरेकेटिंग तोडून भाजपा आमदार खासदारांचा प्रवेश

पालिकेची अधिकृत निमंत्रण पत्रिका न छापता महापौर अजीव पाटील यांनी स्वतःच्या पत्राद्वारे निमंत्रण दिले. शासकीय राजशिष्टाचार डावलण्यात आला असा आरोप भाजपचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि स्थानिक भाजप आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केला. त्यांनी या प्रकाराला विरोधा केला. तर हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत या वास्तूचे उद्धघाटन करण्याचे बविआने निश्चित केले होते. त्यामुळे आज मोठा राडा होईल हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार, विरारच्या क्रीडा संकुलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपा आमदार खासदारांनी गेट आणि बॅरिकेटिंग तोडून केला क्रीडासंकुलनात जबरदस्तीने प्रवेश केला.

भाजपाचा हाय होल्टेज ड्रामा

विरारच्या क्रीडा संकुलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपा आमदार खासदारांनी गेट आणि बॅरिकेटिंग तोडून केला क्रीडासंकुलनात जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आमने-सामने आल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या आंदोलनात भाजपचे खासदार हेमंत सावरा, आमदार स्नेहा दुबे आणि आमदार राजन नाईक यांनी सहभाग घेतला. दोन्ही पक्षातील या हायहोल्टेज ड्राम्याची शहरभर चर्चा सुरू आहे.

Follow Us
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?