AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde: सगळ्यांना एकच व्यक्ती… आता मी जगावं की मरावं? धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ

Dhananjay Munde Sunetra Pawar: मुंडे बहीण-भाऊ गेल्या दोन दिवसांपासून राज्याचा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची व्यथा मांडली. त्यांनी भावनिक आवाहन केले. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून काँग्रेसचा समाचार घेतला. काय म्हणाले धनंजय मुंडे?

Dhananjay Munde: सगळ्यांना एकच व्यक्ती... आता मी जगावं की मरावं? धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ
धनंजय मुंडे, सुनेत्रा पवार
| Updated on: Aug 04, 2026 | 2:35 PM
Share

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नाराजीचा सूर आळवला. पार राजकारणातून निवृत्तिपर्यंतची भाषा वापरली. बीडमधील दोघांचे वक्तव्य मुंबईपर्यंत पोहचले. दोघांची नाराजी प्रकर्षाने समोर आली. आज धनंजय मुंडे यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत मनातील व्यथा समोर आणली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. तर माध्यमांना केवळ एकच व्यक्ती दिसत असल्याचे म्हणत आता मी जगावं की मरावं? असे वक्तव्य केले.

गुंगी गुडियावरून काँग्रेसवर निशाणा

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री यांच्यावर जी टीका केली आणि ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ते वक्तव्य कांग्रेसच्या मनात सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून किती द्वेष आहे हे दिसतं काँग्रेसने आपला इतिहास पाहिला असता तर इंदिराजी देशाच्या महिला पंतप्रधान झाल्या तेव्हा असंच वक्तव्य विरोधी पक्षांनी केलं होतं, असे धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेसला सांगायचं आहे, अधिकृतपेजवर टीका केली त्यावेळी आपल्याकडे सुद्धा बघा. झारखंड मध्ये पेपरफुटी झाली आहे, त्यावर काही बोलले आहे तर लक्षात आलं असतं. दिल्लीत आंदोलन झालं त्यावर झारखंडमध्ये काँग्रेस किती यासंदर्भात पेपरफुटीवर सिरीअस होते हे लक्षात येतं, अशी टीका त्यांनी केली.

कणखर काम त्यांनी केलं

येणाऱ्या काळात अनुभव म्हणून सुनेत्रा वहिनी काम करुन दाखवणार आहेत. काँग्रेसच्या पेजवरुन द्वेष पाहिला मिळाला. त्यांचा बीड दौरा पालकमंत्री म्हणून होता २४ तारखेला संध्याकाळी ५ पासून रात्री ११ पर्यंत त्यांचे काम सुरू होते. दुसर्‍या दिवशी सकाळी ७ पासून अधिकृतपणे प्रेसला पत्र दिलं होतं. पत्रकार परिषद नाही, निवेदन सुनेत्रा पवार करतील. आपण प्रेस पाहिली तर लक्षात येईल, आपलं त्या दु:ख विसरत दादांच्या कामांच्या संदर्भात विषय आल्या तेव्हा त्या भावनिक झाल्या. मी पाहिल्यावर मला लक्षात आलं त्या भावनिक झाल्या अशात म्हणून मी बोललो आपण थांबायला पाहिजे. निवेदन करण्यात येईल, पत्रकार परिषद नाही. याठिकाणी मी स्वत: बोललो , पहिल्यांदा त्या आल्या होत्या. आपलं दुःख विसरत सामान्य माणसांच्या प्रति असलेल्या निष्ठेसाठी त्या आल्या होत्या. बीड माध्यमांसंदर्भात मी ट्वीट केलं ९५ टक्के पत्रकार चांगलं काम करतात. मात्र काही जणांना बीडचं राजकारण निवळू द्यायचं नाही. तसूभरही ते कमी पडू देत नाही, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

चमत्काराचे वक्तव्य आणि स्पष्टीकरण

चमत्कार माझा तब्येतीसाठी होता, राजकारणासाठी नव्हतं, असे धनंजय मुंडे म्हणाले. मी बोललो शांतपणे बोला. प्रेस संपली निवेदन होतं, यात हुकूमशाही कुठून आली. तुम्ही मागे लागला तरी मी बोलत नाही. आमदार म्हणून पण मी हुकूमशाह बोलणं किती योग्य आहे, किती हा माझा द्वेष? लोकशाहीत मायबाप जनतेची सेवा आम्ही करत आलो. ३५ वर्ष मी टाचा घासल्या. २५२ दिवस माझं मीडिया ट्रायल झालं. माझी विनंती आहे, माझ्या भाषणाचा सार काढा, तर्क काढा, टीका करण्यासाठी वाव मिळू शकतो त्यावर बोला, असे आवाहन मुंडे यांनी केले.

आता मी जगावं की मरावं?

सगळ्यांना एकच व्यक्ती दिसतो. माझ्यावर काहीही टीका करावी मान्य आहे. मात्र माझ्या मुला बाळावर, मातीला बदनाम करायचं , बीडला बदनाम करायचं. भाषणात बोललो चमत्कार दाखवायची वेळ आली आहे, मी आरोग्यासंदर्भात बोलत होतो. काय करणार? आता काय करणार? आता मी जगावं की मरावं?, अशी उदग्निता त्यांनी व्यक्त केली. माझ्या सारख्या संवेदनशील व्यक्ती समाजकारणात आहे की नाही मला माहिती नाही. मीडिया ट्रायल करत आहे, मलाच टार्गेट करत आहे, इतना सा हु मै. एकाच समाजघटकाला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. जातीचे करतोय, फलानं करतोय, उद्विग्न होतं मी राजकारणासंदर्भात मी बोललो, असे मुंडे म्हणाले.

कोर्टाने दंड समोरच्याला ठोठावला आहे. नियतीवर विश्वास आहे, पुरावा देत मी आरोप करायचो. अंजली दमानिया यांना १ लाखांचा दंड लावला आहे, हायकोर्टाने, माध्यमांनी हिंमत करावी आणि त्यांना विचारावे. बीड कायदा सुव्यवस्थेवर मला काही बोलायचं नाही. त्यांच्यावर विषय आला की कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. माझी हात जोडून विनंती आहे, बीड परळी माध्यमांना विनंती माझ्या मातीला बीडला बदनाम करु नका, असे आवाहन त्यांनी केले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी