AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Indora Dighori Flyover : उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव; फडणवीस-गडकरींच्या उपस्थितीत लोकार्पण, नागपूरकरांचा किती वेळ वाचणार?

नागपूरमधील इंदोरा-दिघोरी या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा नामकरणाचा निर्णय घेण्यात आला.

Nagpur Indora Dighori Flyover : उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव; फडणवीस-गडकरींच्या उपस्थितीत लोकार्पण, नागपूरकरांचा किती वेळ वाचणार?
Nagpur Indora Dighori FlyoverImage Credit source: social media
| Updated on: Sep 19, 2026 | 8:16 PM
Share

नागपूरकरांसाठी सध्या एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आली आहे. नागपूरमधील सर्वात लांब अशा इंदोरा ते दिघोरी उड्डाणपुलाचं अखेर लोकार्पण झालं आहे. विशेष म्हणजे, या भव्य उड्डाणपुलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात आलं आहे. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष सुरू आहे, आणि याच पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वाचा नामकरणाचा निर्णय घेण्यात आला. या पुलाचा लोकार्पण सोहळा सध्या शहरातील प्रसिद्ध अशा कविवर्य सुरेश भट सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी खासदार गेव्ह आवारी यांचीही व्यासपीठावरील उपस्थिती लक्ष वेधून घेतली.

आता या उड्डाणपुलाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं, तर हा नागपूर शहरातल्या आजवरच्या सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच तब्बल 8.9 किलोमीटरचा उड्डाणपूल आहे. या महाकाय प्रकल्पासाठी जवळपास  9.98.27 कोटी रुपयांचा मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. शहरातल्या प्रमुख भागांना जोडणारा हा पूल नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. हा पूल कमाल चौक, रेशीमबाग, सक्करदरा, भांडे प्लॉट आणि थेट दिघोरी नाका या वर्दळीच्या आणि प्रमुख भागांना एकमेकांशी जोडणार आहे. त्यामुळे या परिसरातील रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.

या सगळ्यात नागरिकांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे त्यांच्या प्रवासाच्या वेळेत होणारी मोठी बचत. सध्या इंदोरा आणि दिघोरीदरम्यानचा प्रवास करण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे किमान 30 मिनिटांचा वेळ लागतो. पण आता हा उड्डाणपूल पूर्णपणे सुरू झाल्यानंतर, हाच प्रवास अवघ्या 8 ते 9 मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा वेळ आणि इंधन या दोन्हीची मोठी बचत होईल. पुलाच्या लोकार्पणानंतर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत अतिशय सकारात्मक बदल नक्कीच पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी