AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये विमानतळाजवळ स्फोट, अनेक फ्लाइटसना विलंब, हवाई हल्ल्याचा अलर्ट

सौदी अरेबियाची राजधानी रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ धुराचे लोट आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. हौथी बंडखोरांशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी आग आणि धूर पाहिल्याचे सांगितले. मात्र, सौदी सरकारने अद्याप या घटनेची किंवा तिच्या कारणांची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये विमानतळाजवळ स्फोट, अनेक फ्लाइटसना विलंब, हवाई हल्ल्याचा अलर्ट
| Updated on: Sep 19, 2026 | 8:23 PM
Share

पश्चिम आशियामध्ये हौथी बंडखोरांसोबतच्या संघर्ष सुरू असतानाच सौदी अरेबियाच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे्त.सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात आकाशात धुराचे मोठे लोट आणि आग दिसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र, या घटनेची अद्याप सौदी सरकारकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ किमान एका स्फोटाचा आवाज ऐकण्यात आला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एएफपीशी बोलताना एका स्थानिक नागरिकाने आपबिती कथन केली. आम्ही विमानतळाच्या दिशेने काळा धूर आणि आग पाहिली, असा दावा त्याने केला. याच दरम्यान, फ्लाइटरडार 24च्या डेटानुसार, अनेक विमानांच्या येण्या जाण्याच्या वेळांमध्ये विलंब झाल्याचं दिसून आलं आहे. वेबसाइटवर 3.5 आणि 5 च्या दरम्यानचा ‘डिले इंडेक्स’ म्हणजे मोठ्या प्रमाणात विलंब तसेच अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाल्याच्या गंभीर अडचणी आढळून आल्या.

मात्र, या सर्वांदरम्यान सौदी सरकारने अद्याप या स्फोटाबाबत किंवा तेथील आगीच्या कारणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. असं असलं तरीही हुथी बंडखोरांनी डागलेले ड्रोन आणि रॉकेट्स हवेतच रोखून सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणने ते नष्ट केले, असं यापूर्वी अनेकदा स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळेच, मिसाइल्स किंवा ड्रोनच्या अवशेषांमुळे हा स्फोट झाला असावा, असा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.

अलर्ट जारी

हुथी बंडखोरांशी तणाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या राजधानीत अशा प्रकारचा इशारा जारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी एका संभाव्य हवाई हल्ल्याबाबत सौदी अरेबियाने इशारा दिला होता, ज्यामुळे देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हा इशारा रात्रभर कायम होता, त्याचदरम्यान विमानतळाजवळ काळ्या धुराचे लोट उठताना दिसले होते.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने घटनास्थळावरील व्हिडीओ आणि फोटोंचा संदर्भ देत विमानतळाजवळील परिसरातून काळ्या धुराचे मोठे लोट वर जात असल्याचे वृत्ता नमूद केलं होतं.  स्फोटामुळे उठलेला धूर, त्या पार्श्वभूमीवर विमानतळाचा हायवे, मुख्य टर्मिनलची इमारत आणि इतर सुविधा असं दृश्य दिसत होतं, अशी माहिती समोर आली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी