AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krushna Abhishek : गणेशोत्सवाच्या निमित्ताने कौटुंबिक मिलन, कृष्णा-कश्मीराच्या घरी पोहोचल्या सुनीता आहुजा

Krushna Abhishek : अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही कुटुंबांची दिलजमाई झाली आहे. सणासुदीच्या काळात आनंदाचं वातावरण असून गणेशोत्सवानिमित्त सुनीता अहुजानी भाच्याच घर गाठलं.

Krushna Abhishek : गणेशोत्सवाच्या निमित्ताने कौटुंबिक मिलन, कृष्णा-कश्मीराच्या घरी पोहोचल्या सुनीता आहुजा
| Updated on: Sep 19, 2026 | 7:54 PM
Share

Krushna Abhishek And Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा आणि त्याचा भाच्चा अभिनेता कृष्णा अभिषेक यांच्यात कित्येक वर्षांपासून वाद सुकू होते, मात्र आता अखेर त्यांचं भांडण मिटलं आहे. या पॅचअपनंतर गोविंदा-कृष्णाचे चाहतेही खूप आनंदी आहेत. आणि हे फॅमिली रियुनिअन असल्याचं अनेकांचं मत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंब बऱ्याचदा एकत्र दिसली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी कृष्णआ अभिषेक आणि आरती हे दोघे सुनीता आहुजा यांच्या घरी गेले होते. तर आता मामी सुनीता अहुजा याही पहिल्यांदाच कृष्णा अभिषेकच्या घरी गेलेल्या दिसल्या. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला असून चाहते चांगलेच आनंदले आहेत.

शुक्रवारी गणपती दर्शनासाठी सुनीता आहुजा या त्यांचा भाचा कृष्णा अभिषेकच्या घरी पोहोचल्या. तिथे गेल्यावर कृष्णा, कश्मीरा आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवले. विशेष म्हणजे यावेळीकृष्णा-काश्मिीरा यांची जुळी मुलं रायन आणि कृशांग यांनी त्यांच्या आजीचं जोरदार स्वागत केलं. तिला नमस्कार करून त्यांनी आशीर्वादही घेतले.नातवांना पाहून सुनीता आहुजा देखील भावुक आणि आनंदी झाल्या. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. यावेळी त्या रायन आणि कृशांगला किसही केलं. कृष्णा आणि काश्मीरानेही सुनीता यांचं मनापासून स्वागत केले. या खास प्रसंगी सुनीता आहुजा एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही उपस्थित होता. मात्र, कुटुंबातील जवळपास सर्व सदस्य एकत्र दिसत असताना गोविंदा मात्र इथे कुठेच दिसला नाही.

‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटवर झाली होती दोन्ही कुटुंबांची भेट

कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्या कुटुंबांमधील नात्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट’च्या सेटवर दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि वातावरणातील कटुता कमी होताना दिसली. या भेटीदरम्यान सुनीता आहुजा यांनी कश्मीराला मिठी मारली होती. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कश्मीरा देखील सुनीता यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचली .

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी