AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडचं प्रकरण समोर; धनंजय मुंडे तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत काय ठरणार?

फडणवीसांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे सह्याद्रीवर; भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट एनसीपी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यांनी ही भेट नेमकी का घेतली आहे. याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

वाल्मिक कराडचं प्रकरण समोर; धनंजय मुंडे तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत काय ठरणार?
Dhananjay Munde Devendra Fadnavis MeetingImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 5:50 PM
Share

धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसाची भेट घेऊन त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. पण भेटीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. आज सकाळीच एनसीपी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांचंदेखील नाव घेतलं होतं. वाल्मिक कराड यांच्यासंदर्भाने बरेचशे आरोप त्यांनी केलेले पाहायला मिळाले होते. वाल्मिक कराडशी कार्यकर्ते तुरुंगात असूनही संपर्कात आहेत. त्यांचे संपर्क होण्यावरुन सोनावणेंनी गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा होणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण यासंदर्भात गृहमंत्रालयाने लक्ष घालावं, राज्य सरकारने योग्य ती कारवई करावी असं आवाहन केलं होतं. दहशतीचं वातावरण कुठेही असू नये अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष लागंल आहे. काही खाजगी कामानिमित्त ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र नेमकी खरी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे धनंजय मुंडे यांना त्यांचं मंत्रीपद गमवावं लागलं होतं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरुन वाल्मिक कराड हा सघ्या तुरुंगात आहे. जेलमधून तो त्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन हे खळबळजनक दावे केले आहेत. दरम्यान, वाल्मिक जेलमधून मोबाईल फोनवर बोलत असल्याचा कथित व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यांनंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीनंतर पुढे काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत