AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shruti Haasan : एकत्र असताना त्यांच्यात खूप…आई-वडिलांच्या नात्याबद्दल स्पष्टच बोलली श्रुती हासन; अनेक वर्षांपूर्वी झालाय घटस्फोट

Shruti Haasan : श्रुती हासननं नुकत्याच एका मुलाखतीत वडील कमल हासन आई सारिका यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

Shruti Haasan : एकत्र असताना त्यांच्यात खूप...आई-वडिलांच्या नात्याबद्दल स्पष्टच बोलली श्रुती हासन; अनेक वर्षांपूर्वी झालाय घटस्फोट
| Updated on: Nov 16, 2026 | 3:54 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच श्रुती एक उत्तम गायिका देखील आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं आई-वडील कमल हासन आणि सारिका यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं. दोघांचा घटस्फोट झाला असला तरी, एकत्र असताना त्यांच्यात किती प्रेम होतं, याबद्दल तिनं काही खास आठवणी सांगितल्या.

आई-वडिलांच्या नात्याबद्दल काय म्हणाली श्रुती?

कमल हासन आणि सारिका यांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र, आई-वडील एकत्र असताना त्यांच्यात अतिशय घट्ट नातं आणि प्रेम होतं, असं श्रुतीने सांगितलं. ‘एसएस पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘माझे आई-वडील आता एकत्र नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. पण जेव्हा ते एकत्र होते, तेव्हा त्यांच्यात खूप प्रेम होतं. ते एकमेकांसोबत खूप आनंदी असायचे. एकत्र मजा करायचे आणि एकमेकांसोबत कामही करायचे. ते दोघेही एकमेकांचे क्रिएटिव्ह पार्टनर होते. लहानपणीही मला असं वाटायचं की, जेव्हा मी मोठी होईन आणि मला बॉयफ्रेंड किंवा पती असेल, आम्हीही यांच्याप्रमाणेच एकत्रच राहावं.’

श्रुती हासन चार वर्षे कलाकार शंतनू हजारिका याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, 2024 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्या श्रुती सिंगल असून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. विशेष म्हणजे, शंतनूसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही तिला लग्न करण्याची विशेष इच्छा नव्हती.लग्नाबद्दल बोलताना श्रुतीनं यापूर्वी सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये आपलं मत व्यक्त केलं होतं. ती म्हणाली होती, ‘मला सहवास नक्कीच आवडतो. पण मी आजवर कोणत्याही एका चौकटीत अडकून राहिले नाही. काही बाबतीत मी पारंपरिक विचारांची आहे, तर काही गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन जुन्या विचारांचा आहे. हे विचार मात्र कोणीही माझ्यावर लादलेले नाहीत.’

दरम्यान, श्रुती हासन शेवटची 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटात झळकली होती. लोकेश कनगराज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात नागार्जुन, सौबिन शाहीर, उपेंद्र, सत्यराज आणि रचिता राम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. अभिनेता आमिर खाननेही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर