AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : 20 रुपयांची थाळी ते 2.5 कोटींचा टर्नओवर.. दृष्टीकोन बदलून टाकणारी 65 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या जिद्दीची गोष्ट.. दृष्टीकोन बदलून टाकणारी 65 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या जिद्दीची गोष्ट

घरांच्याचा विरोध झुगारून केवळ आपल्या कष्टावर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवून एका 65 वर्षीय महिलेने कोट्यावधींच साम्राज्य उभं केलं आहे. 20 रूपयांच्या थाळीपासून सुरू झालेला व्यवसाय आज कोट्यावधींची उलाढाल करत आहे.

Success Story : 20 रुपयांची थाळी ते 2.5 कोटींचा टर्नओवर.. दृष्टीकोन बदलून टाकणारी 65 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या जिद्दीची गोष्ट.. दृष्टीकोन बदलून टाकणारी 65 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या जिद्दीची गोष्ट
DEVI DEVI AMMAS KITCHENImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 16, 2026 | 3:19 PM
Share

काही लोकांना वाटतं की व्यवसाय सुरू करायचा असेल तर मोठं भांडवलं, चांगलं शिक्षण आणी भरपूर अनुभव लागतो. पण बिहारच्या देवनी देवी यांनी हे सगळे समज बाजूला सारले. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी आपल्या साध्या स्वयंपाकाच्या कौशल्यातून कोट्यावधींचा व्यवसाय उभा केला. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रवासाची सुरूवात अवघ्या 20 रूपयांच्या जेवणाच्या ताटापासून! आणि आज त्यांचा तो व्यवसाय कोट्यावधींची उलाढाल करत आहे.

देवनी देवी यांचं लग्न अवघ्या 16 व्या वर्षी झालं. लग्नानंतर त्या बिहारमधील 25 सदस्यांच्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा भाग बनला. एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी रोज स्वयंपाक करणं. जेवणाचं नियोजन करणं आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळणं ही त्यांची रोजची जबाबदारी होती. त्यांच्याकडे कोणातीही बिझनेस डिग्री नव्हती किंवा हॉटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षणही नव्हतं. पण वर्षांनुवर्ष स्वयंपाक करताना त्यांना मोठ्या प्रमाणात चविष्ट जेवण बनवण्याचा चांगला अनुभव मिळाला होता.

2002 मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी त्या पटना शहरात स्थलांतरित झाल्या. तिथे एकदा त्याची नजर मेडिकलच्या विद्यार्थांच्या टिफिनवर पडली. त्या डब्यातील जेवणाची अवस्था पाहून त्यांना घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या घरगुती जेवणाती किती गरज आहे. हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी त्या विद्यार्थांसाठी जेवण बनवण्याचा निर्धार केला.

सुरूवातीला त्यांनी फक्त 20 रूपये प्रति थाळी या दराने जेवण देण्यास सुरूवात केली. सौरभ नावाचा एक मेडिकल विद्यार्थी त्यांचा पहिला ग्राहक ठरला. सुरूवातीच्या काळात स्वयंपाक करणं, डबे पॅक करणं आणि विद्यार्थांपर्यंत पोहोचवणं ही सगळी काम त्या स्वत:च करत होत्या. हळूहळू विद्यार्थांमध्ये त्यांच्या जेवणाची चर्चा होऊ लागली. अनेक जण पुन्हा पुन्हा जेवण मागवू लागले आणि प्रेमाने त्यांना अम्मा म्हणू लागले.

मात्र त्यांचा हा निर्णय घरात आणि आसपासच्या लोकांना फारसा पसंद नव्हता. बाहेर जाऊन काम करण्यावरून त्यांच्या घरातून प्रचंड विरोध होता. त्यांच्या पतीने काही महिने त्यांच्याशी बोलणेही टाळले होते. पण देवनी यांनी काम थांबवलं नाही. व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांची त्यांनी बचत केली आणि त्याच पैशातून त्यांनी 8 रिक्क्षा खरेदी केल्या. 2009 मध्ये त्यांनी त्यांच्या नातीच्या नावावर ‘समृद्धी गर्ल्स हॉस्टेल सुरू केलं, त्यांच्या टिफिन सेवेतील काही विद्यार्थींच या हॉस्टेलचे पहिले रहिवासी बनले. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी घरी परतल्यामुळे आणि हॉस्टेल बंद झाल्यामुळे व्यवसायाला मोठा फटका बसला. तरीही त्यांनी स्वयंपाक आणि जेवण पोहोचवणं सुरूच ठेवलं. त्या काळात डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्येही त्यांनी जेवण पाठवलं. स्वतः कोरोना संक्रमित झाल्यानंतर पटणा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असताना, पूर्वी त्यांच्याकडून जेवण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची काळजी घेतली.

2022 मध्ये मुलाच्या सल्ल्यानुसार त्यांनी अम्मा किचन ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलं आणि व्यवसायाला नवी दिशा मिळाली. ऑर्डर वाढू लागल्या आणि पुढे डाईन- ईन- रेस्टॉरंटही सुरू झाले. आज पटण्यात अम्माच्या किचनचे दोन आउटलेट्ही आहेत, तिथे 30 हून अधिक कर्मचारी देखीसल काम करतात. दररोज जवळपास 350 ऑनलाईन ऑर्डर्स मिळातात. थाळीचे दर 100 ते 300 रूपयांदरम्यान आहेत. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे 2.5 कोटी रूपये सल्याची माहिती आहे. हळूहळू करून संपूर्ण कुटुंब या व्यवसायात जोडले गेले.

आज 65 व्या वर्षी देवनी देवी यांनी दाखवून दिलं आहे की, व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी नेहमी मोठ्या भांडवलाची गरज नसते. कधीकधी आपल्या रोजच्या कामातल्या कौशल्यातूनही मोठं स्वप्न उभं राहू शकतं. 20 रूपयांच्या एका थाळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अनेकांना रोजगार देणाऱ्या व्यवसायापर्यंत पोहोचला आहे

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर