AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणांच्या सेलिब्रेशनची बदलतेय व्याख्या! काय आहे फेस्टिव्ह स्टेकेशनचा नवा ट्रेंड?

Festive Staycation Trend: सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये घरीच सेलिब्रेशन करण्याऐवजी अनेक कुटुंबे आता 'लक्झरी स्टेकेशन'ला पसंती देत आहेत. सणांच्या दिवसांत स्टेकेशन ट्रिपचा ट्रेंड का वाढत आहे, जाणून घेऊया.

सणांच्या सेलिब्रेशनची बदलतेय व्याख्या! काय आहे फेस्टिव्ह स्टेकेशनचा नवा ट्रेंड?
| Updated on: Nov 16, 2026 | 3:16 PM
Share

सणासुदीच्या काळात घराची साफसफाई, सजावट, स्वयंपाकाची तयारी आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी यांची मोठी लगबग असते. या सगळ्या धावपळीत अनेकदा सणांचा आनंद घेण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे आता अनेक कुटुंबे घरी सेलिब्रेशन करण्याऐवजी स्टेकेशनला जाणे पसंत करत आहेत. घरातील कामांचा ताण न घेता सणांचा आनंद घेता यावा, तसेच लक्झरी हॉटेलमधील आरामदायी सुविधा आणि खास अनुभव घेता यावेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. स्टेकेशनमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळते. त्यामुळे सण साजरे करण्याची ही नवी पद्धत लोकप्रिय होत आहे. चला तर मग जाणून घेऊया, सणासुदीच्या काळात स्टेकेशनचा ट्रेंड का वाढत आहे.

सण साजरे करण्याची नवी पद्धत

पूर्वी सण म्हटले की घरीच कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करणे, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि पाहुण्यांची ये-जा असे चित्र असायचे. मात्र, आता सेलिब्रेशनची पद्धत बदलत आहे. अनेक कुटुंबे एखाद्या खास ठिकाणी एकत्र येऊन सण साजरे करण्यास पसंती देत आहेत. हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये सणांची सजावट, पारंपरिक वातावरण आणि खास अनुभव मिळत असल्याने हा पर्याय लोकप्रिय होत आहे. आज लोकांना सणांचा उत्साह आणि परंपरांचा आनंद घ्यायचा आहे; मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीचा ताण नको असतो. लक्झरी हॉटेल्समध्ये जेवणापासून ते इतर व्यवस्थांपर्यंत सर्व सुविधा मिळतात. त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन मनसोक्त सेलिब्रेशन करू शकतात आणि एकमेकांसोबत निवांत वेळ घालवू शकतात.

खास अनुभवांना पसंती

सण म्हटले की खास खाद्यपदार्थ आणि पारंपरिक पक्वान्नांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे विविध प्रांतांतील पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेणे हा स्टेकेशनचाही महत्त्वाचा भाग बनत आहे. आता लोकांना केवळ हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा त्यासोबत काही खास अनुभवही हवे असतात. ही गरज लक्षात घेऊन हॉटेल्सकडून सणांसाठी विशेष कार्यक्रम आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे सेलिब्रेशनसोबत आरामाचाही आनंद घेता येतो आणि कुटुंबीयांसोबत आठवणीत राहतील असे क्षण घालवता येतात.

छोट्या सहलींचा वाढता ट्रेंड

यंदा सणासुदीच्या काळात स्टेकेशनबाबत लोकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे. यामागील एक कारण म्हणजे अनेक सण आठवड्याच्या शेवटी आले आहेत. त्यामुळे कामातून अतिरिक्त सुट्टी न घेता छोटी सहल आखणे शक्य झाले आहे. वेळेची बचत व्हावी आणि प्रवासाचा थकवा जाणवू नये, यासाठी लोक जवळच्या ठिकाणांना पसंती देत आहेत. अशा छोट्या सहलींमुळे कमी वेळेत सणांचा आनंद घेता येतो. सणांसाठी खास कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या हॉटेल्स व रिसॉर्ट्सना लोक अधिक पसंती देत आहेत. येथे जेवण, सांस्कृतिक कार्यक्रम, कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याच्या संधी आणि आरामदायी सुविधा एकाच ठिकाणी मिळतात. काही ठिकाणी वेलनेस सुविधांसोबतच कुटुंबातील सर्व वयोगटांसाठी खास उपक्रमही आयोजित केले जातात. त्यामुळे स्टेकेशन हा केवळ फिरण्याचा पर्याय न राहता सण साजरे करण्याचा एक वेगळा अनुभव ठरत आहे.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर