AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbra News: शेजाऱ्यांनी दिलेली मिठाई खाल्ली, 5 जणांची प्रकृती चिंताजनक; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील मिठाईच्या दुकानातून नेलेली मिठाई खाल्ल्याने पाच जणांची प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचाही दावा कुटुंबियांनी केला आहे.

Mumbra News: शेजाऱ्यांनी दिलेली मिठाई खाल्ली, 5 जणांची प्रकृती चिंताजनक; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
| Updated on: Nov 16, 2026 | 4:01 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी: Mumbra Food Poisoning Case:  सणासुदीचे दिवस आहेत. सणासुदीच्या दिवसात तुम्हीही मिठाई खरेदी करत असाल? आपल्या प्रियजनांना देत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात मिळाई घेताना काळजी घेणे आता गरजेचे झालं आहे. कारण मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील मिठाईच्या दुकानातून नेलेली मिठाई खाल्ल्याने पाच जणांची प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचाही दावा कुटुंबियांनी केला आहे.

शेजाऱ्यांनी मिठाई दिली, 5 जणांची प्रकृती बिघडली!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील मिठाई दुकानातून 8 तारखेला एक ग्राहक मिठाई घेऊन गेला होता, त्यानंतर आजूबाजू ला राहणाऱ्यांनी मिठाई खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 35 वर्षीय जुबेर अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेनंतर मुंब्रा पोलीस आणि FDA पथकाने दुकानावर कारवाई करत मिठाईचे नमुने तपासणीसाठी घेतले असून मिठाईचे दुकान बंद करण्यात आले आहे. दरम्यान, मिठाई आणि मृत्यूचा संबंध अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही.

कुटुंबियांनी काय सांगितलं?

“ही मिठाई आमच्या शेजाऱ्यांकडून आम्हाला मिळाली होती. पाच जणांनी ही मिठाई खाल्ली होती, ज्यानंतर सर्वांना त्रास होऊ लागला. पाच जणांनी एक- एकच तुकडा खाल्ला होता. त्यांना तासाभराने उलटी. जुलाबाचा त्रास होऊ लागला. यापैकी चौघांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले होते. आम्ही एफडीएकडेही तक्रार दिली आहे,” त्यांनीही याबाबत योग्य तपास करु असं आश्वासन दिल्याचे मृत तरुणांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

तसेच “झुबेर अन्सारी यांना मिठाई खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला. त्यांना उलट्या, जुलाब होऊ लागले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती. त्यांना डिस्चार्जही मिळणार होता. मात्रनंतर तिसऱ्या दिवशी त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती. त्यांचं लिव्हरही खराब होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे कुठेही रुग्णाला घेतले नाही, शेवटी आज त्यांचा मृत्यू झाला,” असं मृताच्या भावानने सांगितले.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर