धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी …
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना मुंडे यांनी राजकारणात राहावं की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला.
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना मुंडे यांनी राजकारणात राहावं की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला.
राज्यातील राजकारण सध्या रसातळाला गेल्याची खंत धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. सध्या जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण सुरू असल्याचे सांगत, “अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की खरंच आज राजकारणात राहावं की न राहावं,” असं मोठं विधान त्यांनी केलं.
मुंडे यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर निशाणा साधला. जरांगे म्हणाले, “जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, मराठ्यांसह सगळ्या जातींनी मोठं केलं आणि टोळीने ओरबाडून खाल्लं.”
पुढे त्यांनी, “ना ओबीसी मोठा होऊ दिला ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला,” असा आरोप केला. तसेच मुंडे यांना सल्ला देताना, “तु शहाणा हो मराठ्यांच्या नादी लागू नको,” असे म्हटले.
याशिवाय, “कोणताही पक्ष, कोणीही तुला जवळ करणार नाहीत,” असेही जरांगे म्हणाले. शेवटी त्यांनी, “काळ यायचा काळ गेला आता मध्ये जायचा वेळ आला आहे,” असे सांगत धनंजय मुंडे यांना टोला लगावला.
Published on: Aug 03, 2026 04:45 PM
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...

