AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबर आझमची इज्जतच काढली, पाकिस्तानचाच माजी खेळाडू रागाने लाल, इंग्लंड दौऱ्यात….

पाकिस्तानच्या संघात मोठे बदल होत असताना कर्णधारालाच त्याची माहिती नसण्यावरुन वसीम आकरम यांनी निशाणा साधला आहे. कर्णधारपद स्वीकारण्याऐवजी बाबरने केवळ फलंदाजीवर लक्ष द्यायला हवं होतं, असं आकरम यांनी म्हटलं आहे.

बाबर आझमची इज्जतच काढली, पाकिस्तानचाच माजी खेळाडू रागाने लाल, इंग्लंड दौऱ्यात....
Wasim Akram criticism on Babar Azam captaincyImage Credit source: social media
| Updated on: Sep 20, 2026 | 10:50 PM
Share

पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर वसीम आकरम यांनी बाबर आझमला सोपवलेल्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे. मॅन्चेस्टरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना बाबर आझमकडे पाकिस्तानने पुन्हा एकदा कसोटी कर्णधार पदाची धुरा सोपवल्याबद्दल टीका केली आहे. त्यांनी सांगितलं की, बाबरला पुन्हा एकदा कर्णधारपद देण्यापेक्षा त्याच्याकडे फलंदाजीतच चांगली कामगिरी करण्याची भूमिका दिली पाहीजे. आकरम यांनी पाकिस्तानच्या इंग्लंडमधील दौऱ्याचा संदर्भ देताना सांगितलं की, बाबरला कर्णधारपद देणं मला योग्य वाटत नाही.

मला कोणाला चुकीचं ठरवायचं नाही मी स्वतःही चुकीचा असू शकतो पण मला असं वाटतं की बाबरने कर्णधारपदाला नकार द्यायला हवा होता. कारण याची काही गरजच नव्हती. बाबरला माहितीच नाही की तो काय करतोय, त्याला जर माहिती असेल की तो काय करतो आहे. तर तुम्ही काय इंग्लंडमध्ये चने विकायला थोडी आला होतात.  इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघात करण्यात आलेल्या मोठ्या बदलांबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सात खेळाडूंना संघातून वगळून त्यांना मायदेशी परत पाठवले होते, तसेच कोचिंग स्टाफमध्येही बदल केले होते. नाणेफेकीच्या वेळी या निर्णयांबद्दल विचारले असता, बाबरने आपल्याला त्याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. यावरून वसीम आकरम यांनी बाबर आझमवर उपरोधिक टीका केली आहे ते म्हणाले, “बाबर आझम म्हणाला की त्याला काहीच माहित नव्हते. जर तुला काहीच माहित नव्हते, तर मग तू इथे काय करत होतास? तू इथे हरभरे विकायला आला होतास का?” कर्णधाराच्या भूमिकेवर भाष्य करताना आकरम यांनी या गोष्टीवर भर दिला की, कठीण काळामध्ये खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे एका लिडरसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे मला असं वाटतं की फलंदाज म्हणून तरी  इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली असती. बाबर फलंदाज म्हणून खेळला तर त्याचा संघाला फायदा होऊ शकतो, असं मत आकरम यांनी व्यक्त केलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल