AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..तर LPG सिलिंडरच्या सबसिडीला मुकाल, नवा नियम 1 ऑक्टोबरपासून, घर बसल्या मोबाईलने अशी करा e-KYC

१ ऑक्टोबरपासून, अनुदानित सिलिंडरचे बुकिंग सुरू ठेवण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण ( म्हणजेच e-KYC ) अनिवार्य असणार आहे. अन्यथा, सिलिंडरवरील २१० चे अनुदान मिळणार नाही...

..तर LPG सिलिंडरच्या सबसिडीला मुकाल,  नवा नियम 1 ऑक्टोबरपासून, घर बसल्या मोबाईलने अशी करा e-KYC
E KYC cylinder LPG SUBSIDY
| Updated on: Sep 20, 2026 | 10:26 PM
Share

केंद्र सरकारने देशभरात घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी e-KYC संदर्भात नवीन आदेश जारी केला आहे. १ ऑक्टोबरपासून सबसिडीवाले सिलिंडर बुकींग जारी ठेवण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजे केवायसी करणे अनिर्वाय होणार आहे. अन्यथा सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद होईल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे पाऊल बोगस कनेक्शन बंद करण्यासाठी आणि सबसिडीचा फायदा सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी उचलण्यात आले आहे.

८९.९ टक्के युजर्सची e-KYC पूर्ण

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १९ सप्टेंबर पर्यंत २७.४३ कोटी एक्टीव्ह घरगुती एलपीजी ग्राहकांपैकी ८९.९ टक्के KYC प्रमाणीकरण पूर्ण केली आहे. यांची रिफील बुकींग कोणत्याही व्यत्ययानुसार चालू राहणार आहे. ज्या ग्राहकांची कागदपत्रांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे त्यांची बुकींग कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु राहणार आहे. ज्या ग्राहकांचे प्रमाणीकरण अपूर्ण राहिले आहे त्यांचे सबसिडी वाली रिफिल बुकींग प्रमाणीकरण पूर् झाल्यानंतर प्रोसेस होईल.

e-KYC न केल्यानंतरही सिलिंडर मिळेल –

सरकारने म्हटले आहे की जे ग्राहक बायोमेट्रींक ऑथेंटिकेशन करु इच्छीत नाहीत किंवा असमर्थ आहेत. त्यांनाही सिलिंडर मिळेल. मात्र त्यांना सबसिडी मिळणार नाही. त्यासाठी त्यांना डिजिटल चॅनल, एप्स, व्हॉट्सअप वा IVRSद्वारे आपला पर्याय निवडावा लागेल. त्यांना बाजाराच्या दरात ५ किलोग्रॅम वा १० किलोग्रॅमचे सिलिंडर दिले जातील.

घरगुती ग्राहकांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी केवायसी सुरुवातीची डेडलाईन ३० जून २०२६ करण्यात आली होती. त्यानंतर ३१ जुलै, ७ ऑगस्ट,१५ ऑगस्ट,२३ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ७ सप्टेंबर आणि अखेर १४ सप्टेंबर डेडलाईन करण्यात आली.

एलपीजी e-KYC चे सहा स्टेप पाहा –

HP Gas, Indane,bharat gas ज्या कंपनीचे कनेक्शन आहे त्याचे एप्स डाऊनलोड करावे. फेस ऑथेंटिफिकेशनसाठी aadhaar authentication चा पर्याय शोधा आणि क्लिक करा.

आधार ऑथेंटिकेशन सुरु करावे –

क्लिक करताच आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरु होईल.

face authentication वर जा..

फेस ऑथेंटिकेशन सुरु झाल्यानंतर एप्स तुम्हाला aadhar faceRD एप्सवर घेऊन जाईल.

चेहऱ्याचे स्कॅन करावे –

FaceRD एप्स कॅमेऱ्यांनी तुमचा चेहरा स्कॅन करेल. स्क्रीनवर दिलेल्या निर्देशानुसार चेहरा कॅमेऱ्यासमोर सरळ ठेवावा. पापण्या हलवण्यास सांगितले तर १ ते २ सेंकदासाठी पापण्या मिठाव्यात.

KYC पूर्ण झाल्याचा मॅसेज –

फेस व्हेरिफिकेशन सफल होताच ही LPG कंपनीसाठी एप्समध्ये e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल