AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब

Sanjay Raut | …अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब

| Updated on: Aug 06, 2026 | 10:42 AM
Share

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा निकाल ठाकरे गटाच्याच बाजूने लागेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

कालच्या सुनावणीमुळे शिंदे गटात चलबिचल सुरू झाल्याचे राऊत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटासमोर आता भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय असल्याचा दावा केला. तसेच कालच्या सुनावणीतील एक महत्त्वाची बाब त्यांनी सांगितली. राऊत म्हणाले, ‘त्यांच्या पाठीशी महाशक्ती होती, हे कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ त्यामुळे आता ते लवकरच त्या महाशक्तीत जातील, असेही त्यांनी म्हटले.

‘माझी आजची माहिती अशी आहे की, समोरच्या पक्षात चलबिचल सुरू झाली आहे. आता पक्षच भाजपमध्ये विलीन करण्याची चर्चा आहे. एक लहान पक्ष अलीकडे विलीन करून घेतला होता. टीएमसी प्रमाणे सुरू आहे. आता लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील. त्यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करतील,’ असा दावा राऊत यांनी केला.

निवडणूक आयोगाचा चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यास महाराष्ट्रातील जनता आणि देशातील लोकशाहीचा मोठा विजय होईल, असेही राऊत म्हणाले.

Published on: Aug 06, 2026 10:42 AM

Follow Us