Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
काँग्रेससह इंडिया आघाडीतील खासदारांनी संसद भवनाबाहेर एकत्र येत "अमित शाह उत्तर द्या" अशा जोरदार घोषणा दिल्या आणि सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आजही संसद परिसरात विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले. काँग्रेससह इंडिया आघाडीतील खासदारांनी संसद भवनाबाहेर एकत्र येत “अमित शाह उत्तर द्या” अशा जोरदार घोषणा दिल्या आणि सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेत पुन्हा एकदा गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही सभागृहांमध्ये सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. अखेर वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
दरम्यान, विरोधकांनी अमित शाह यांनी संबंधित मुद्द्यावर संसदेत येऊन उत्तर द्यावे, अशी मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे संसदेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, दुपारच्या सत्रात सरकार आणि विरोधक यांच्यातील भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 06, 2026 12:26 PM
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप

