कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
मराठवाड्यातील काही नवीन कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. यामुळे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अडचणीत आल्याचा दावा केला जात आहे.
मराठवाड्यातील काही नवीन कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. यामुळे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अडचणीत आल्याचा दावा केला जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून सरकारवर गंभीर आरोप केले.
15 लाख रुपयांसाठी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसेच हे प्रमाणपत्र कोणाच्या आदेशाने रद्द करण्यात आले, याचे नावही त्यांनी जाहीर केले. फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायचे. मी एकटा पडावा म्हणून सरकार ने जाणून बुजून कट रचला,” असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच “सरकारने निवडून मराठ्यांकडून यायचं आणि नंतर मराठ्यांचा घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी आरोप केले. शवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हीच नोंद ग्रामपंचायत मध्ये लावली. तुमचा(म्हणजे भाजप)उमेदवार निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला, असा आरोप जरांगे पाटील यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांच्यावर केला.
Published on: Aug 06, 2026 12:38 PM
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन

