Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
मीरा रोडच्या काशिमिरा परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना एका २३ वर्षीय तरुणाच्या डोक्यावर लाकडी तुकडा पडून तो जखमी झाला. सुरुवातीला सिमेंटचा ब्लॉक कोसळल्याचे वृत्त होते, मात्र तपासणीत लाकडी तुकडा पडल्याचे स्पष्ट झाले. जखमी तरुणाची प्रकृती स्थिर असून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
मीरा रोड, काशिमिरा परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान एका २३ वर्षीय तरुणाला अपघात होऊन तो जखमी झाला आहे. पुलाखाली रस्ता ओलांडताना फोनवर बोलत असलेल्या या तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक कोसळल्याचे सुरुवातीला वृत्त होते. मात्र, टीव्ही ९ मराठीच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता वेगळीच माहिती समोर आली.
प्रत्यक्षात, वर सुरू असलेल्या आरसीसी कामातून एक लाकडी तुकडा तरुणाच्या डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणाला तात्काळ मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. टीव्ही ९ मराठीसाठी वैभव घाग यांनी मीरा भाईंदरमधून ही बातमी दिली आहे.
Published on: Sep 21, 2026 01:16 PM
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...

