Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
सोलापुरात संभाजी ब्रिगेडने करपलेली पिके घेऊन सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मंत्र्यांच्या सुकामेवा प्रसंगाचा निषेध करत, आंदोलकांनी चटणी-भाकर खात आपली निदर्शने नोंदवली.
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सोलापुरात आज संभाजी ब्रिगेडने सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. करपलेली सोयाबीन पिके घेऊन, काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी अशा घोषणा देत हे आंदोलन चार हुतात्मा स्मारक चौकात फुटपाथवर बसून करण्यात आले.
कृषी मंत्र्यांच्या बैठकीत सुकामेवा खातानाचा प्रसंग समोर आल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. सत्तेतील मंत्री सुकामेवा खात असताना शेतकरी मात्र दुष्काळामुळे त्रस्त आहेत, हे दाखवून देण्यासाठी आंदोलकांनी चटणी-भाकर खाल्ली. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी प्रमुख मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. शेतकऱ्यांचा पुढचा चरितार्थ चालावा यासाठी निधी मिळावा, असे आंदोलक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन सरकारच्या असंवेदनशीलतेविरोधात आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी होते.
Published on: Sep 21, 2026 01:33 PM
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...

