AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajpal Yadav : राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा थेट लिलाव; 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या दोन प्रॉपर्टींचा लिलाव होणार आहे. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेनं आता थेट लिलावाची नोटीस पाठवली आहे. कर्ज वसुलीसाठी जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली आहे.

Rajpal Yadav : राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा थेट लिलाव; 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात
Rajpal YadavImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 06, 2026 | 12:55 PM
Share

अभिनेता राजपाल यादवचं चेक बाऊन्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे राजपालच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईने शहरातील आणि गावातील या दोन मालमत्तांच्या लिलावासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राजपाल यादववर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईचे 16.61 कोटी रुपये थकीत आहेत. तर राजपालच्या दोन मालमत्तांचं मूल्य अंदाजे 19.26 कोटी रुपये आहे.

‘अता पता लापता’ हा चित्रपट बनवण्यासाठी राजपाल यादवने बँकेकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेनं गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला असून लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या नोंदीनुसार शहाजहानपूरमध्ये राजपालच्या दोन मालमत्ता आहेत. एक शहरात आणि दुसरी गावात असून त्यात एक शेतजमीन आणि एका घराचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा लिलाव 9 सप्टेंबर रोजी ऑनलाइन होणार आहे.

राजपाल यांच्या प्रॉपर्टींचा लिलाव

राजपालने कर्जासाठी जामीनदार म्हणून पत्नी राधा यादव आणि त्याची आई गोदावरी यादव यांच्या मालमत्ता गहाण ठेवल्या होत्या. याच्या आधारावर बँकेनं त्या मालमत्तांवर कारवाई सुरू केली आहे. शहाजहानपूर व्यतिरिक्त मुंबईतील त्याच्या इतर मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राजपाल यादवविरोधात चेक बाऊन्सचा खटला दाखल करणाऱ्या कंपनीचा मालकसुद्धा शाहजहानपूर इथलाच आहे. या प्रकरणामुळे राजपाल फक्त कायदेशीरच नाही तर आर्थिक समस्यांचाही सामना करत आहे. त्याच्या मालमत्तेवर लिलावाची नोटीस लावल्यापासून चर्चा आणखी तीव्र झाल्या आहेत. कर्ज वसूल करण्यासाठी नियमांनुसार ही कारवाई केली जात असल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

राजपाल यादवने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून 16.61 कोटी रुपयांचं कर्ज पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांच्या नावावर घेतलं होतं. परंतु तो वेळेवर या कर्जाची परतफेड करू शकला नाही. दोन वर्षांपूर्वी बँकेने यासंदर्भात एक नोटीस लावली होती. आता पुन्हा एकदा बँक प्रशासनाकडून त्याच्या मालमत्तेवर कर्ज वसुलीसाठी जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली आहे.

Follow Us
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन