AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे हे..मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

Manoj Jarange Patil : "राजकीय स्वार्थासाठी एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून होत आहे. शिंदेंच्या इथे मराठ्यांचे विरोधक कसे काय जातात? हा सर्वांचा ठरवून प्लान आहे"

Manoj Jarange Patil : फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे हे..मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 06, 2026 | 12:50 PM
Share

कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आज त्यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. आरोपांची राळ उडवून दिली. पुन्हा मुंबईत यावं लागेल असंही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भरपूर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भरपूर तोंडसुख घेतलं. “मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती.किती दिवस डबल ढोलकी वाजवणार. मी मिंधा नाही,जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही” असं मनोज जरांगे पाटील बोलले. ‘बावनकुळे हा फडणवीस यांचा मालक झाला का?’ असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

“एकनाथ शिंदे यांच्या नेत्याच्या कॉलेज मध्ये बैठका घेता. फडणवीस यांनी चांगल्या, चांगल्याच्या झाक उतरवल्या. परंतू मी त्यांची झाक उतरवली. फडणवीस साहेब तुम्ही राजकारणातून संपेल म्हणून खूप मेटाकुटीला आले होते. तुमचं सगळं काढीन. बावनकुळे यांनी प्रमाण पत्र रद्द करायला लावले. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आता वेळ पडली तर मुंबईला जावं लागणार आहे” असही जरांगे पाटील बोलले. “एकट्या बावनकुळेसाठी फडणवीस तुमचं संपूर्ण नेटवर्क अडचणीत येईल” असा दावा जरांगेंनी केला.

मला बदनाम करायचं काम सुरू आहे

“फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे आदेश काढूच शकत नाही. हे एकाचं काम नाही. माझा पहिला विश्वास मराठ्यांवर आहे. दुसरा मीडियावर आहे. मला डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. मला एकटं पाडायचं आहे. माझ्या विरोधात कट आहे. मला बदनाम करायचं काम सुरू आहे. मी काँग्रेसचा नाही, भाजपचा नाही, कुणाचाच नाही. त्यामुळे त्यांना जड जात आहे. त्यामुळे मला बदनाम करून बाजूला सारायचं आहे. मराठ्यांचा माझा विश्वास आहे. हे पोरगंच आरक्षण देऊ शकतो, हे मराठ्यांना माहीत आहे. माझे समर्थक मरमर करत आहेत. पण काही लोक त्यांचेच पाय चाटत आहेत” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल