AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case : ‘ज्या विषयासाठी आलो त्याच..’ दिशा सालियन प्रकरणात प्रश्न विचारताच संजय जाधव यांचं रोखठोक उत्तर

Disha Salian Case : परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदाम खाल्ल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली.

Disha Salian Case : 'ज्या विषयासाठी आलो त्याच..' दिशा सालियन प्रकरणात प्रश्न विचारताच संजय जाधव यांचं रोखठोक उत्तर
Sanjay Jadhav
| Updated on: Sep 21, 2026 | 7:22 AM
Share

रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी : दोन दिवसांपूर्वी दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदाम खाल्ल्यामुळे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. काल संजय जाधव यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील हे उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल आहेत. “अंतरवाली सराटी हे गाव माझ्या लोकसभा मतदारसंघातील आहे. त्यांचं आणि माझं नातं हे जिव्हाळ्याचं आहे. त्यामुळे माझ्या घरातील व्यक्ती जर आजारी असेल तर जाऊन भेटणार आणि त्यांची विचारपूस करणे माझं कर्तव्य आहे” असं संजय जाधव जरांगे पाटील यांच्या भेटीवर म्हणाले. सध्या दिशा सालियन प्रकरणावरुन बऱ्याच राजकीय घडामोडी सुरु आहेत. त्यावर मात्र संजय जाधव यांनी उत्तर देणं टाळलं. “त्या विषयावर नको ना बाबा आता, कारण तो विषय मला माहितीच नाही,ज्या विषयासाठी आलो त्याच विषयासाठी विचाराना” अशी प्रतिक्रिया दिली.

काही दिवसापूर्वी संजय जाधव यांनी परभणीत मेळावा घेतला होता. असा मेळावा घेऊन नका म्हणून जरांगे पाटील यांनी बजावलं होतं. तरी मेळावा घेतला. त्यावरही संजू जाधव बोलले. “घरातल्या एखाद्या कर्त्या व्यक्तीने त्यांच्या माणसाला बोलायचा अधिकार असतो, त्यामुळे ते बोलले तर निश्चितच वाईट वाटण्याचं कारण काही नाही. त्यावेळी त्यांच्या भावना वेगळ्या होत्या, की मी समाजासाठी लढतोय आणि तुम्ही अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत आहात. त्यामुळे हे सहाजिक होतं. भाषण संपल्यानंतर मी शेवटी बोललो होतो, पाटलांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो” असं संजय जाधव म्हणाले.

‘ते बाकीचं नको माझा विषय काय आहे ते सांगा’

जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर टीका होतेय, त्यावर ते म्हणाले की, ‘ते बाकीचं नको माझा विषय काय आहे ते सांगा’. विजय वडेट्टीवार यांच्या आरोपावर म्हणाले की, “त्यांच्याकडे जे काय असतील ते शासनाकडे देतील ना आणि शासन त्याची शहानिशा करेल. आरोप करायला काय लागतं, उचलली जीभ लावली टाळूला, या म्हणण्याला अर्थ नाही. कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय सिद्ध होऊ शकत नाही”

1972 चा दुष्काळ आम्ही ऐकला होता

दुष्काळी परिस्थितीवरही संजय जाधव बोलले. “विशेष अधिवेशन घ्यावं न घ्यावं पण दुष्काळ जाहीर करावा ही मागणी असेल. पिण्याच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न असेल. अनेक गोष्टींनी शेतकरी त्रस्त आहे. 1972 चा दुष्काळ आम्ही ऐकला होता, त्यामुळे आता अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावं. शेतकऱ्याला या दुष्काळाच्या धर्म संकटातून वाचवलं पाहिजे, देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्यामुळे बळीराजा संकटात असेल तर त्यांना मदत करण्याची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे” असं संजय जाधव म्हणाले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल