AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?

ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?

| Updated on: Nov 06, 2026 | 9:24 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधातील मनी लॉन्ड्रिंगची ईडी केस अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. पीएमएलए न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. मूळ गुन्हे रद्द झाल्याने ईडी तपास सुरू ठेवू शकत नाही, असे विशेष न्यायालयाने नमूद केले. मुश्रीफांनी या निर्णयाचे स्वागत करत माझी दिवाळी गोड झाली अशी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अधिकृतपणे बंद केला आहे. पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने ईडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधातली 2022 सालातील ही केस कायमची बंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी “न्यायदेवतेने चांगला निर्णय घेतला, माझी दिवाळी गोड झाली” असे म्हटले आहे. तसेच, “मी न्यायदेवतेचा आभारी आहे की मला दिलासा मिळाला,” असेही ते म्हणाले. विशेष न्यायालयाने नोंदवले आहे की, संबंधित मूळ गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्याने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही टिकू शकत नाही. त्यामुळे मूळ गुन्हा रद्द झाल्याने मनी लॉन्ड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवणे शक्य नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ईडीने ऑगस्ट महिन्यात हा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. अखेर, या प्रकरणात ईडीने मुश्रीफांविरोधातला तपास अधिकृतपणे बंद केला आहे.

Published on: Nov 06, 2026 09:24 AM

Follow Us