AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवारांवर नाराजीची चर्चा, शरद पवारांना भेटत प्रफुल पटेल यांनी प्रेशर पॉलिटिक्स सुरू केलं का?

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान मोदींच्या फोननंतर प्रफुल पटेल हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील नाराजीदरम्यान ही दबावतंत्राचा भाग आहे का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पार्थ पवारांवर नाराजीची चर्चा, शरद पवारांना भेटत प्रफुल पटेल यांनी प्रेशर पॉलिटिक्स सुरू केलं का?
praful patel newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 9:39 AM
Share

दोन्ही राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोननंतर काल सुनेत्रा पवारांच्या पक्षातील प्रफुल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू असताना प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीच्या निमित्ताने प्रफुल पटेल यांचं दबावतंत्र आहे का, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी गुरवारी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीच्या आडून प्रफुल पटेल यांचं दबावतंत्र सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांआधी प्रफुल पटेल यांनी इतर नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करून प्रफुल पटेल यांनी वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न केलाय. सध्या  पार्थ पवारांवरील नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले. प्रफुल पटेल हे 11 तारखेनंतर शरद पवार यांना पुन्हा भेटणार आहेत.

शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल पटेल म्हणाले , मला शरद पवारसाहेब रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. मी त्यांना भेटायला आलो. शरद पवार साहेबांची तब्येत चांगली आहे. फक्त थकवा आला होता. त्यामुळे चेकअप करायला आले आहेत.  काय चालले यावर चर्चा झाली, ते माझे राजकिय गुरु आहेत.  मी त्यांच्यासोबत 40 वर्ष काम केले. ते ब्रीच कॅंन्डीला तपासणीसाठी आले आहेत. त्यांना पुढील 2-3  दिवसात डिस्चार्च मिळणार आहे.  राजकिय भूमिका दुरावली, तरी मन दुरावली नाहीत. मी नेहमीच त्यांना भेटत असतो.  बाकीच्या काही चर्चा झाली नाही.  राज्यात काय चालले आहे ही चर्चा झाली.  देशात, आंतराष्ट्रीय राजकारणात काय चालले आहे, यावर त्यांना माहिता घ्यायला आवडते’.

Follow Us
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु