AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life : ‘ज्यांच्यासाठी पैसे कमवले त्यांनीच…’, लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट, 60 व्या वर्षी दुसरा संसार थाटताच अभिनेता म्हणतो…

Love Life : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ज्याने वयाच्या 60 व्या वर्षी दुसरा संसार थाटला...

Love Life : 'ज्यांच्यासाठी पैसे कमवले त्यांनीच...', लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट, 60 व्या वर्षी दुसरा संसार थाटताच अभिनेता म्हणतो...
Ashish Vidyarthi
| Updated on: Nov 06, 2026 | 9:39 AM
Share

Love Life : बॉलिवूडचे दमदार अभिनेता आशीष विद्यार्थी यांनी खलनायक म्हणून स्वतःची ओळख भक्कम केली. आशीष खलनायक म्हणून प्रसिद्धी झोतात आले. पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. सांगायचं झालं तर, आशीष विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत आहेत. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी पहिलं लग्न आणि घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं. आशीष विद्यार्थी यांचा वयाच्या 55 व्या वर्षी 24 वर्षांचा संसार मोडला. बायको आणि मुलगा दूर गेल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात एकटेपणा आला.अशात दुसरं लग्न केल्यानंतर अभिनेत्याला अनेकांचं टोमणे देखील ऐकावे लागले.

24 वर्षात मोडला आशीष विद्यार्थी यांचा संसार…

नुकताच झालेल्या मुलाखतीत आशीष विद्यार्थी म्हणाले, ‘पहिलं लग्न मोडल्यानंतर असं वाटलं की, आयुष्यात केलेल्या कमाईचं, गुंतवणुकीला काहीच महत्त्व राहिलेलं नाही. कारण ज्यांच्यासाठी कमवलेलं होतं, तेच आता माझ्या जवळ नाहीत… जेव्हा माझं 24 वर्षांचं लग्न मोडलं, ती वेळ माझ्यासाठी फार भयानक होती. तेव्हा माझं वय जवळपास 55 वर्ष असेल…’, अभिनेत्याने स्पष्ट केलं की, वैवाहिक संबंध तुटण्याचे कारण अत्यंत वैयक्तिक होते आणि त्याबद्दल त्याला सार्वजनिकरीत्या चर्चा करायची नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय त्यांनी इतर कोणासाठीही घेतलेला नव्हता.

दुसऱ्या लग्नावर लोकांनी सुनावले खडे बोल

आशिष यांनी सांगितले, ‘दुसरं लग्न केल्यानंतर अनेकांनी मला टोमणे मारले, पण आयुष्यात माणूस तुटू शकतो, पण त्याला स्वतःला पुन्हा जोडून पुढे जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणालाही दुसऱ्याच्या वेदनांची खिल्ली उडवण्याचा अधिकार नाही. वयाची कोणतीही अट असो, प्रत्येक माणसाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे आणि आनंदी राहण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही.”

आशीष विद्यार्थी यांचं खासगी आयुष्य…

आशीष विद्यार्थी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी यांचं पहिलं लग्न राजोशी बरुआ उर्फ पिलू यांच्याशी झालं होतं. त्यांना अर्थ नावाचा एक मुलगा आहे. मे 2023 मध्ये आशिष यांनी रुपाली बरुआ यांच्याशी दुसरं लग्न केलं. अभिनेत्याने सांगितलं की, रुपाली यांच्याशी फिरणं, चहा पिणं आणि गप्पा मारणं हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांना जाणीव झाली आहे की, सोबती आणि प्रेमाचं महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले.

Follow Us
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु