AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नको तीच धमकी..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. इराणला धमकी अमेरिकेने दिली आहे. इराण अमेरिका युद्धात पुढील काही तासात काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत.

जगात हाहाकार! ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नको तीच धमकी..
Donald Trump threat
| Updated on: Sep 21, 2026 | 7:21 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या युद्धामुळे इतरही देश संकटात आले. काही आठवडे चालण्याचा अंदाज असलेले युद्ध काही महिन्यांपासून थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता जगाची झोप उडवणारी धमकी अमेरिकेने दिली. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला. आता स्थिती एका निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे भाष्य त्यांनी केले. तेहरानने आपली भूमिका न बदलल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले. माझा प्रश्न असा आहे की, मी पूर्ण देश कधीही आणि कसा नष्ट करू शकतो… त्यांनी आता नीट वागलेलेच बरे… म्हणत मोठा इशारा इराणला देण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी त्या देशाला संपूर्ण नष्ट करू शकतो. त्यांची आर्थिक घडी विस्कटून टाकू शकतो. काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न ते करू शकतात. मात्र, जर असे झाले नाही तर लवकरच मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट अत्यंत मोठा इशारा इराणला देण्यात आला. यासोबतच आपल्या सुट्ट्या अर्धवट सोडून डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या हाय-लेव्हल वीक अंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय बैठकांपूर्वी बोलताना, ट्रम्प यांनी राजनैतिक चर्चेसाठी आपली तयारी दर्शवली आहे. ते इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा करण्यास इच्छुक असू शकतात, असेही सांगू शकतात. मात्र, इराणकडून मध्यस्थी करणाऱ्या कतारला प्रस्ताव देण्यात आला.

इराणने आपल्या सात मागण्या त्या प्रस्तावात ठेवण्यात आला. मात्र, अमेरिकेकडून त्यावर सकारात्मक विचार केला जाऊ शकेल, अशी स्थिती नाही. त्यातच पुन्हा इराणला धमकी देण्यात आली. इराणने देखील स्पष्ट केले की, आम्ही प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे. अमेरिका आणि इराण युद्धात मोठ्या घडामोड घडताना दिसत आहेत. त्यातच डोनाल्ड ट्रम्प अचानक व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल