AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, तब्बल 100 टक्के टॅरिफ..

अमेरिकेकडून पुन्हा एकदा टॅरिफ लावला जात आहे. अमेरिकेच्या संसदेत त्याबाबत कायदाही मंजूर करण्यात आला. भारत आणि चीनवर मोठा टॅरिफ अमेरिका लावू शकते. 100 टक्के टॅरिफचे दोन्ही देशांवर संकट आहे.

भारताला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, तब्बल 100 टक्के टॅरिफ..
Donald Trump
| Updated on: Sep 19, 2026 | 8:22 AM
Share

अमेरिका पुन्हा एकदा टॅरिफचे शस्त्र काढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेलावरील कडक निर्बंधांवरील विधेयकावर सही केली. या कायद्यानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष 100 टक्के टॅरिफ लावू शकतात. जे देश रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहेत, त्यांच्यावर टॅरिफ लावला जाणार आहे. यातून भारत आणि चीनवर टॅरिफ लागू केला जाऊ शकतो. भारत आणि चीन अमेरिकेच्या निशाण्यावर आहे. अमेरिकेच्या संसदेत या विधेयकासाठी मतदान झाले. या विधेयकाच्या बाजूने 262 मतदान झाले तर विरोधात 159 मतदान झाले. त्यानंतर या विधेयकाला मंजूरी मिळाली. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या मोठ्या 5 देशांवर टॅरिफ लावला जाणार आहे. ज्यात भारत चीन देशांचा समावेश आहे.

यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे महत्वाचा अधिकार असून ते टॅरिफपासून सूट देशांना देऊ शकतात. मात्र, ब्रिक्स परिषदेत भारत, चीन आणि रशिया एकत्र आल्याने अमेरिकेचा मोठा थयथयाट झाला. भारताने अमेरिकेला अगोदरच मोठा इशारा दिला. जर यावेळी अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला तर दोन्ही देशांच्या व्दिपक्षीय संबंधांवर परिणाम होईल. भारताने स्पष्ट केले की, आमच्यासाठी देशाची ऊर्जा सर्वात अगोदर येते.

बाजारातील परिस्थिती बघता आम्ही विविध भागातून कच्चे तेल खरेदी करत आहोत. चीनने देखील अमेरिकेच्या धोरणाचा विरोध केला. चीनने स्पष्ट केले की, दोन देशांमधील व्यापारावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटले की, चीन अशा कारवायांचा विरोध करतो. भारत आणि चीनवर टॅरिफचे संकट आहे.

रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा देश चीन आहे. दुसऱ्या नंबरवर भारत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी भारताच्या मदतीला रशिया धावून आला. रशियाने भारताला हवे तेवढे कच्चे तेल दिले. भारताला हवे तेवढे तेल आम्ही देऊ असे रशियाकडून त्यावेळीच जाहीर करण्यात आले. होर्मुज खाडी बंद असतानाही रशियाने भारताला तेल पुरवठा केला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं