AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होणार? मिड-टर्म निवडणुकीसाठी मतदान सुरू; नोव्हेंबरमध्येच…

अमेरिकेत मिडटर्म निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले असून, हे ट्रम्प यांच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. काँग्रेस, गव्हर्नर आणि स्टेट लेजिस्लेचरसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महागाई, इराण संघर्ष आणि इमिग्रेशनसारखे मुद्दे निर्णायक ठरत आहेत. रिपब्लिकन बहुमत कायम राखणार की ट्रम्प यांना धक्का बसणार, हे नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होणार? मिड-टर्म निवडणुकीसाठी मतदान सुरू; नोव्हेंबरमध्येच...
Donald TrumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 3:32 PM
Share

अमेरिकेत 2026च्या मिडटर्म निवडणुकीचं काउंटडाउन सुरू झालं आहे. व्हर्जिनियात आज मतदानाला सुरुवात झाली आहे. इडाहो, मिनेसोटा आणि साउथ डकोटासारख्या काही राज्यातही मतदार निवडणूक कार्यालय आणि वोटिंग सेंटवर जाऊन अब्सेंटी बॅलेट वोट टाकत आहेत. येत्या आठवड्यातही मोठ्या प्रमाणावर अर्ली वोटिंग सुरू होणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होणार? ट्रम्प यांना धक्का बसणार की पुन्हा पुनरागमन होणार? अशी चर्चा सध्या जगभरात सुरू आहे.

3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अमेरिकन काँग्रेसच्या जागांसोबत अनेक राज्यात गव्हर्नर आणि स्टेट लेजिस्लेचरसाठीही मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक जास्त लक्ष हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस आणि सिनेटवर असणार आहे. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात रिपब्लिकन बहुमत कायम ठेवणार की नाही हे या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत डेमोक्रॅट्स काँग्रेसला बहुमत मिळालं तर ट्रम्प यांच्या शेवटच्या दोन वर्षाच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काँग्रेसमध्ये चौकशी आणि सरकारच्या कामकाजाशी संबंधित घटना घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये ट्र्म्प यांचं राजकीय भविष्यही ठरणार आहे.

महागाई आणि इराणचा मुद्दा

या निवडणुकीत अमेरिकन मतदारांसमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. गॅस आणि किराणा सामानाच्या वाढत्या किंमतीने चिंता वाढली आहे. त्यााशिवाय इराणसोबत सुरू असलेलं दीर्घकाळापासूनच युद्ध, आर्टिफिशियल इंटेलिजेन्सशी संबंधित धोके आणि ट्रम्प यांनी कठोरपणे राबवलेली इमिग्रेशन कारवाई हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत.

निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या (अमेरिकन संसद) जागा आणि सीमांमध्ये फेरबदल झाला आहे. अनेक राज्यांमध्ये नवीन नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्याला ‘काँग्रेसनल मॅप’ असं नाव दिलं गेलं आहे. या बदलामुळे 10 पैकी एक अमेरिकन नागरिक अशा काँग्रेसनल राज्यांतर्गत आले आहेत. 2024मध्ये या जिल्ह्याशी त्यांचा काही संबंध नव्हता.

निवडणूक प्रक्रियेवर चर्चा

निवडणुकीपूर्वी पासूनच निवडणूक प्रक्रियेत ट्रम्प प्रशासनाचा हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे. मतदान प्रक्रियेत काही बदल झाले पाहिजे, अशी गेल्या काही काळापासूनची ट्रम्प यांची मागणी आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच सवाल केले होते. जे अमेरिकन नाहीत, त्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही ते बोलत आहेत.

दरम्यान, एका रिपोर्टमध्ये, जे अमेरिकन नाहीत त्यांना मतदानाचा अधिकार असणं दुर्भाग्याची गोष्ट असल्याचं मह्टलं आहे. याच आठवड्यात मेल बॅलेटवर बंदी घालण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने हाणून पाडला आहे.

Follow Us
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग