मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत… महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध नेत्यांच्या भेटीगाठींना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध नेत्यांच्या भेटीगाठींना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीती आणि राजकीय नियोजनासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी बिहारच्या पोटनिवडणूकीत मिळवलेल्या घवघवीत विजयाची चर्चा होती. गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या प्रशांत किशोर हे निवडून आले. त्यांनंतर आता अचानक त्यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेली भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ही भेट देवगिरीवर झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
दरम्यान, या भेटीमागे कोणतीही राजकीय रणनीती आहे का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीचे कारण स्पष्ट झाल्यानंतरच त्यामागील नेमकी भूमिका समोर येणार आहे. त्यामुळे आगामी काळात या भेटीबाबत आणखी माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 06, 2026 11:16 AM
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...

