AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा, थेट सरकारवरच कट रचल्याचा..

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मोठे विधान केले. यादरम्यान त्यांनी सरकारवर मोठी टीका केली. यासोबतच मोठा कट रचला जात असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा, थेट सरकारवरच कट रचल्याचा..
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 06, 2026 | 12:04 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. ज्यानंतर खळबळ उडाली. मोठा कट रचण्यात आल्याचे यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारने मराठे संपवण्याचा कट रचल्याचे जरांगे यांनी म्हटले. राज्यात सरकारपासून एक कट शिजला गेला. फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट शिजला जात आहे. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायच्या. मी एकटा पडावा म्हणून सरकारने जाणून बुजून कट रचला. पुरेपूर आणि नियोजित कट सरकारकडून रचला गेला. मी सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. सरकारने निवडून मराठ्यांकडून यायचं आणि नंतर मराठ्यांचा घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की,ज्योती शिंदे यांचं प्रमाणपत्र तुम्ही कायमच रद्द करा. प्रचंड गैरसमज निर्माण केला गेला. राजकीय द्वेष्यातून रद्द केले. फडणवीस तुम्ही विनाकारण मराठे अंगावर घेतायत, बावनकुळे रद्द करायला सांगतात. यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हिच नोंद ग्रामपंचायतमध्ये लावली आहे.

तुमचा म्हणजे bjp निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला. जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांचे पुरावे दाखवताना संतप्त झाले आहे. सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, जेवढे दाखवत आहेत.  बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी पत्र दिले. आता सरकारवर जोरदार टीका जरांगे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्रीच हे प्रमाणपत्र रद्द करायला सांगत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. यासोबतच 2029 मध्ये सांगू असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारला मोठा इशारा त्यांनी दिला. आमच्याकडे पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस का म्हणतात, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी यादरम्यान उपस्थित केला. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका, असेही त्यांनी म्हटले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल