AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : आता सरकारविरोधात मोठी लाट, मराठे…मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकलं; नवं वादळ उठलं!

आता सरकारच्या विरोधात खूप मोठी लाट उसळणार आहे. राजकीय लोक अधिकाऱ्यावर दबाव आणत आहेत आणि अधिकाऱ्याला कुणबी नोंदी रद्द करायला लावल्या जात आहेत, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला.

Manoj Jarange Patil : आता सरकारविरोधात मोठी लाट, मराठे...मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकलं; नवं वादळ उठलं!
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 3:51 PM
Share

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कुणबी नोंदी, जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर मुद्द्यांना घेऊन त्यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरलंय. आता मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. आता सरकारविरोधात मोठी लाट येणार आहे, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला. काही ठिकाणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर जात पडताळणीचा अर्ज मात्र फेटाळला जात आहे, यावरुन मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत.

सरकारनेच कुणबी नोंदी शोधल्या

मनोज जरांहे हे छत्रपती संभाजीनगरात बोलत होते. यावेळी बोलताना कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवली जात आहेत. ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारनेच कुणबी नोंदी शोधल्या आहेत. सरकारनेच प्रमाणपत्र दिले आहे. आता त्यांनी ते प्रमाण रद्द केले आहे. यात राजकीय हेवेदावे प्रचंड आहेत. तिकडे राजकारण जळू द्या. मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. परंतु आमच्या समाजाचे नुकसान होत आहे, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला.

रकारला प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार

जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या रक्ताची नोंद सापडली आहे. मग आता सरकारला त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. ओबीसींचे प्रमाणपत्र रद्द केले जात नाहीत. मराठा समाजावर अन्याय का केला जातोय, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने जाणीवपूर्वक मराठ्यांवर अन्याय केला आहे. हे आता मराठ्यांना समजलंय, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला.

कुणबी नोंद कशामुळे रद्द केली?

आता सरकारच्या विरोधात खूप मोठी लाट उसळणार आहे. राजकीय लोक अधिकाऱ्यावर दबाव आणत आहेत आणि अधिकाऱ्याला कुणबी नोंदी रद्द करायला लावल्या जात आहेत. मी याबाबतची सगळी माहिती बोलावली आहे. कुणबी नोंद कशामुळे रद्द केली, हे मला जाणून घेऊ द्या मग मी काय करायचे ते ठरवतो, असा सूचक इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.

Follow Us
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?