AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका बनला इंधनात सुपरपॉवर,अमेरिकेकडून किती देश घेतात कच्चे तेल?, भारत किती खरेदी करतो ?

Top 10 countries buying US oil: अमेरिका जगातील मोठा कच्चा तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश बनला आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल बाजारात इंधनाचे दर वाढले असताना अमेरिकेची स्थिती आणखीन मजबूत बनली आहे. अमेरिकेकडून किती देश तेल खरेदी करतात ते पाहूयात...

अमेरिका बनला इंधनात सुपरपॉवर,अमेरिकेकडून किती देश घेतात कच्चे तेल?, भारत किती खरेदी करतो ?
Top 10 countries buying US oil
| Updated on: Mar 16, 2026 | 8:14 PM
Share

Top 10 countries buying US oil: अमेरिका जगातील मोठा कच्चा तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश बनला आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल बाजारात इंधनाचे दर वाढले असताना अमेरिकेची स्थिती आणखीन मजबूत बनली आहे. अमेरिकेकडून किती देश तेल खरेदी करतात ते पाहूयात…

जगात आखात देशात सर्वाधिक इंधनाचे खनन होते आणि सौदी अरब हा देश कच्च्या तेलाची सर्वाधिक निर्यात करतो, परंतू तुम्हाला हे माहिती आहे का जगातील सर्वात श्रीमंत देश असलेल्या अमेरिकेकडून देखील काही देश इंधन खरेदी करतात. या देशात भारताचाही क्रमांक आहे. अमेरिकेकडून तेल खरेदी करणाऱ्या टॉप-१० देशांची माहिती घेऊयात…

इराणवरील हल्ला आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे ग्लोबल ऑईल मार्केट हादरले आहे. या दरम्यान, होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची तेल वाहतूक थांबली असल्याने कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.स्थिती अशी बनली आहे की जर पुरवठ्यात मोठा अडथळा आला तर जगाच्या एकूण तेल पुरवठ्या २५ टक्के म्हणजे सुमारे २५ दशलक्ष बॅरल तेल प्रभावित होऊ शकते.

याशिवाय इराण समर्थित हुती आणि अन्य बंडखोर गटांनी अमेरिका आणि इस्राईलवर हल्ल्याची धमकी दिली आहे.यामुळे बाब-अल-मांदेब सामुद्रधुनी मधून प्रवास करणाऱ्या जहाजांना धोका निर्माण झाला आहे. जर येथील जहाजांची वाहतूक प्रभावित झाली तर जागतिक तेल बाजारात मोठे संकट निर्माण होऊ शकते.

युद्धामुळे अमेरिका मजबूत खेळाडू

या दरम्यान अमेरिकेचा तेल बाजारात सर्वात मोठा खेळाडू ठरला आहे. अमेरिका आज जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक आणि अनेक देशांना मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करत आहे.

अमेरिकन एनर्जी इन्फोर्मेशन एडमिनिस्ट्रेशन (EIA) चे मते , 2025मध्ये अमेरिकेने एकूण 3.9 अब्ज बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादन निर्यात केले आहे.

अमेरिकेकडून सर्वात जास्त तेल खरीदी करणारे टॉप-10 देश

क्रमांकतेल खरेदी करणारे देश2025 मध्ये किती तेल खरेदी केले
1नेदरलँड्स419 मिलियन बॅरल (10.7%)
2मेक्सिको398 मिलियन बॅरल (10.2%)
3कॅनडा324 मिलियन बॅरल (8.3%)
4साऊथ कोरिया257 मिलियन बॅरल (6.6%)
5जपान247 मिलियन बॅरल (6.3%)
6चीन238 मिलियन बॅरल (6.1%)
7भारत221 मिलियन बॅरल (5.7%)
8ब्राझील133 मिलियन बॅरल (3.4%)
9यूनायटेड किंगडम124 मिलियन बॅरल (3.2%)
10स्पेन95 मिलियन बॅरल (2.4%)

कसे बनला अमेरिका तेलाचा सुपरपॉवर ?

अमेरिकेने 2020 पासून लागोपाठ दर तिमाहीत नेट ऑईल एक्सपोर्टर बनला आहे. यामुळे जेवढे तेल आयात करतो त्यापेक्षा जास्त निर्यात करतो. यामागची कारण शेल गॅस आणि शेल ऑईल टेक्नॉलॉजी आहे. २००८ नंतर अमेरिकेच्या तेल निर्यातीत सुमारे ८०० टक्के जबरदस्त वाढ झाली आहे. मात्र याच काळात अमेरिकेची तेल आयात सुमारे ३८ टक्के घटला आहे.

कोणत्याही काळात जेव्हा २००६ मध्ये अमेरिका दर तिमाहीला सुमारे ४०० मिलियन बॅरल तेलाचा नेट आयात करतो. परंतू २०२५ पर्यंत स्थिती पूर्णपणे बदलली आणि आता तो दर तिमाहीला सुमारे १०० दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा नेट एक्सपोर्टर बनला आहे.

तेल महागले तर अमेरिकेची कमाई वाढणार

इराणच्या संकटाआधी अमेरिकेच्या WTI क्रूड सुमारे ५५ डॉलर प्रति बॅरल होते. त्या किंमतीवर अमेरिकेच्या तेल कंपन्याना वार्षिक सुमारे ६२ अब्ज डॉलरचा कमाई निर्माण करते. परंतू तेव्हा तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहचली आहे.

जर किंमत याच टप्प्यावर राहिली तर अमेरिकन तेल कंपन्यांना वार्षिक फ्री कॅश फ्लो १६१ अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकते. म्हणजे सध्याच्या स्थितीत अमेरिकन तेल कंपन्यांना सुमारे १०० अब्ज डॉलरचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो.त्यामुळे म्हटले जात आहे की जागतिक तणावाच्या स्थितीतही अमेरिकेच्या तेलाचा व्यवसाय आधी पेक्षा जास्त मजबूत झाला आहे.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल