AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या राज्यात सर्वाधिक एलपीजीचे ग्राहक, PMUY योजनेचा लाभ नेमका किती जणांना ?

LPG Consumers India: इराण, इस्राईल आणि अमेरिका दरम्यान चालू असलेल्या तणावाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत आहे. चला तर भारतातील कोणता राज्यात सर्वात जास्त एलपीजीचा वापर होतो ते पाहूयात...

कोणत्या राज्यात सर्वाधिक एलपीजीचे ग्राहक, PMUY योजनेचा लाभ नेमका किती जणांना ?
LPG Consumers India
| Updated on: Mar 16, 2026 | 8:28 PM
Share

इराण आणि इस्राईल-US युद्धाच्या तणावामुळे संपूर्ण जगभरात ऊर्जासंकट निर्माण झाल आहे. होर्मेुज स्ट्रेट हा समुद्री मार्ग इराणने बंद केल्याने आता इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात अनेक भागात एलपीजी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांना पुन्हा चुलींवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. तर काही कुटुंबात इंडक्शन कुकटॉपचा वापर करुन सिलिंडर टंचाईवर मात केली जात आहे. अशात आपण आज पाहूयात भारताच्या कोणत्या राज्यात एलपीजी वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा किती जण लाभ घेत आहेत ?

एलपीजी वापर करणाऱ्यांची संख्या

उत्तर प्रदेशात एलपीजी वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच सुमारे ४.८७ कोटी एलपीजीचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या आहे. ही देशाच्या एकूण घरगुती एलपीजीचा वापर करणाऱ्या लोकांच्या सुमारे १५ टक्के आहे. मोठी लोकसंख्या आणि गावातील वापर यामुळे एलपीजीचा वापर करण्यात उत्तर प्रदेश सर्वात पुढे आहे.

भारतात एलपीजीचा वापर करणारे लोक

भारतात ३३.३७ ते ३४ कोटी सक्रीय घरगुती एलपीजीचा वापर करणारे लोक आहेत. गेल्या १० वर्षात सरकारी योजना आणि पुरवठ्याचे वाढलेल्या नेटवर्कमुळे  शहर आणि गावातील स्वयंपाकासाठी गॅसचा वापर वाढला आहे, या विस्तारामुळे लाकूड, कोळसा आणि केरोसिनसारख्या पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी झाले आहे.

एलपीजीचा वापर करण्यात दुसरी राज्ये

उत्तर प्रदेशानंतर अन्य राज्यातही एलपीजीचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात सुमारे ३.०२ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुमारे २.७२ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. तामिळनाडूत सुमारे २.४ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. बिहारात सुमारे २.३३ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात.

पंतप्रधान उज्ज्वला योजना

पंतप्रधान उज्ज्वला योजना आर्थिक रुपाने कमजोर कुटुंबियासाठी स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पोहचवण्यात महत्वाची मोठी भूमिका बजावत आहे. ही योजना गरीब कुटुंबासाठी महिलांना एलपीजी कनेक्शन देते. आतापर्यंत या योजनेंतर्गत संपूर्ण देशात एकूण १०.५६ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत.

उज्ज्वला योजनेची सर्वात जास्त लाभार्थी राज्ये

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांत उत्तर प्रदेश पुन्हा एकदा या यादीत सर्वात पुढे आहे. या राज्यात सुमारे १.८८ कोटी कुटुंबियांना या योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन मिळतात. यानंतर पश्चिम बंगालचा नंबर आहे.पश्चिम बंगालमध्ये १.२४ कोटी लाभार्थी आहेत. यानंतर बिहारात सुमारे १.१८ कोटी कुटुंबियांना या योजनंतर्गत लाभ मिळतो.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल