देशातील या गावात दिवाळीत फटाके फोडले जात नाहीत, शंभर वर्षांपासूनची परंपरा, एका मुक्या जीवासाठी…
या गावातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हे जीव त्यांचे पाहुणे आहेत आणि त्यांचे शांततामय जीवन गावाच्या समृद्धिचा आधार आहे. त्यामुळे या जीवांच्या रक्षणासाठी गावात फटाके न फोडता दिवाळी साजरी केली जाते.

VIRAL STORY: तामिळनाडूत मयिलादुथुरई जिल्ह्यातील पेरम्बूर गावात गेल्या एका शतकापासून फटाख्यांशिवाय दिवाळी साजरी केली जाते. येथे वळ्वाल थोप्पू ( वटवाघूळांची बाग ) स्थित 150 वर्षे जुन्या वडाच्या झाडावर शेकडो वटवाघळांचा डेरा आहे. या मुक्या जीवांना जीवघातक ध्वनी प्रदुषण आणि धुरापासून वाचवण्यासाठी अनेक पिढ्या येथे दिवाळीत फटाके फोडत नाहीत. गावकरी केवळ दिवे पेटवून आणि मंदिरात पूजा करुन दिवाळी साजरी करतात. पर्यावरण आणि वन्य जीवसंरक्षणाचा हा धडा केवळ पेरम्बूरपर्यंत मर्यादित नाही. तर तामिळनाडूच्या कझुपेरुम्पक्कम आमि किट्टमपालयम सारख्या अन्य गावात देखील या संवेदनशीलतेला आपल्या संस्कृतीचा एक भाग बनवले आहे.
सुमारे १५० वर्षांचे जुने वडाच्या झाडावर शेकडो ‘इंडियन फ्लाईंग फॉक्स’ (मोठे फळभक्षी वटवाघूळ) रहातात. गाववाल्यांनी ठरवलेले की या मुक्या जनावरांचा आसरा केवळ आपल्या आनंदासाठी उजाडू न देण्याचा निर्णय येथील गावकऱ्यांनी घेतला. वटवाघूळे हे पर्यावरणी साखळीतील महत्वाचे सजीव आहेत. हे फळांच्या बियांना पसरवणे आणि परागकण पसरवण्यात महत्वाची भूमिका निभावतात. ज्यामुळे जंगलाचा आणि हिरव्या वनस्पतींचा विस्तार होतो. वटवाघूळे रात्रीचे भोजनासाठी बाहेर पडत असतात आणि दिवसा आराम करत असतात. त्यामुळे फटाख्यांचा मोठा आवाज आणि धुर त्यांचे संतुलन बिघडवू शकतो. या धोक्याला ओळखून गावकऱ्यांनी अनेक पिढ्यांपासून फटाख्यांना दूर ठेवले आहे. ते दिवाळी केवळ दिवे लावतात आणि पूजा करतात. फटाख्यांना हात लावत नाहीत.
तामिळनाडूतील अन्य गावातही संदेश
निसर्गाबद्दल असलेली ही संवेदनशीलता केवळ पेरम्बूरपर्यंत मर्यादित नाही. विल्लुपुरुम जिल्ह्यातील कझुपेरुम्पक्कम गावात देखील वटवाघळांच्या सुरक्षेसाठी फटाक्यांवर बंदी आहे. कोयम्बतूर किट्टमपालयम गावात साल २०१२ मध्ये शाळांद्वारे एक मोहिम सुरु केली. ज्यानंतर शेकडो परिवारांनी सणात फटाके न वाजवण्याचा संकल्प केला आहे. या गावातील लोकांचे म्हणणे आहे की हे जीव त्यांचे पाहुणे आहेत आणि त्यांचे शांततामय जीवन गावाच्या समृद्धिचा आधार आहे.
मुक्या जीवांना काही त्रास होणार नाही
आज पेरम्बुरचा हा अनोखा प्रयत्न निसर्ग प्रेमी आणि पर्यटकांना स्वत:कडे खेचत आहे. या गावात पर्यटनामुळे रोजगाराची आशा वाढली आहे. मात्र, यामागे एक चिंताही सतावत आहे. जर माणसांची गर्दी जास्त झाले तर येथील शांतता भंग होईल. सध्या वनविभाग आणि स्थानिय लोक एक असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे ज्यात पर्यटक दूरुनच यांना पाहू शकतील आणि या मुक्या जीवांना काही त्रास होणार नाही.
