AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा हरियाणा होतो आहे, लातूरच्या ऑनर किलींगवरुन प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

ऑनर किलिंगवर महाराष्ट्रात अद्याप धोरण नाही. बीड प्रकरणानंतर पोलिस अधिकाऱ्यांमध्ये देखील जातीय वाद शिरला आहे. पोलिसांवर जी कारवाई व्हायला हवी होती ती झाली नाही असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचा हरियाणा होतो आहे, लातूरच्या ऑनर किलींगवरुन प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
| Updated on: Jan 22, 2025 | 5:27 PM
Share

जे हरियाणात घडले ते आता महाराष्ट्रात होत आहे. माऊली सूत या १८ वर्षांच्या कॉलेज विद्यार्थ्यांचे रोहिणी हिच्याशी प्रेम संबंध जुळले. माऊलीच्या आईने मुलीला समजावले की लग्न होणार नाही. आणि पोराच्या बापाने त्या मुलीला घराकडे सोडले आणि आपल्या पोटच्या पोराला समजावले. परंतू तरीही पोरीच्या बापाने माऊलीला चिट्टी पाठवून बोलावले. आणि त्याला मोटर सायकलच्या सायलन्सरने इतके मारले की त्याची हाडे फ्रॅक्चर झाली आणि तो अर्धवट बेशुद्ध झाला. या नंतर बापाने पोराला जगविण्यासाठी पाच एकर जमीन विकली, परंतू पोरगं हातचं गेले. महाराष्ट्राच्या हरियाणा झाला आहे. बीडच्या मराठा – वंजारी वादानंतर आता धनगर – मराठा वाद निर्माण झाला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

जे हरियाणात घडत होते ते आता महाराष्ट्रात घडत आहे. माऊली सुत या १८ वर्षांचा कॉलेजवयीन तरुणाची ऑनर किलींगमध्ये मुलीच्या वडीलांनी हत्या केली आहे. लातूरच्या गावातील माऊली सूत याचे त्याच गावातील रोहिणी नावाच्या मुलीशी प्रेम संबंध जुळले होते. ही सोयरिक होणार नाही असे माऊलीच्या आईने रोहिणी हीला सांगून पाहीले, परंतू मुलीने मुलाच्या घरी राहण्याचा हट्ट धरला. त्याच दिवशी माऊलीला चिट्टी पाठवून घरी बोलविण्यात आले आणि बेदम मारण्यात आली. त्याची हाडं फ्रॅक्चर केली. जागीच तो बेशुद्ध झाला. पोलीस त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले नाहीत. अखेर नातेवाईकांनी रुग्णालय गाठले. दोन दिवस अर्धवट बेशुद्ध होता. ९ जानेवारीला त्याने प्राण सोडले. बीडच्या बॅकग्राऊंडवर हे प्रकरण पहिले तर धनगर विरुद्ध मराठा असेच आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

बाईकच्या सायलेन्सरने मारले

आम्ही जाऊन भेट दिली आहे. वातावरण शांत राहील म्हणून आम्ही सांगितले. तपासात पोलिसांनी ज्या उणीवा सोडल्या त्या आम्ही दाखवून दिल्या आहेत. जो आरोपी पकडला ते नमूद केले आहे माऊली सूत आहे त्याला एफआयआरनंतर २ दिवस पाहीले नाही. त्याचे कपडे कुठे ठेवले ? कसे ठेवले? हे पाहिलं आणि आपण तेथे गेल्यावर चौकशी सुरु झाली. चिट्टी ताब्यात घ्यायला पाहीजे होती. फिंगर प्रिंट तपासली पाहिजे होती. कोणी आय व्हीटनेस आहे त्याचा ही शोध घेतला नाही. बाईकच्या सायलेन्सरने मारले आहे. डॉक्टरांचं स्टेटमेंट अद्याप आलेलं नाही. दुर्दैव म्हणजे तो बेशुद्धावस्थेत असताना त्याला डिस्चार्ज दिला गेला.

५ एकर जमीन विकून बरे करण्याचा प्रायत्न

घरच्यांनी पाच एकर जमीन विकून त्याला बरे करण्याचा प्रायत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत जी नर्स त्याला सेवा देत होती तीचीही स्टेटमेंट घेतलेली नाही, अद्यापही स्वतः च्या जातीचं वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न होऊन ऑनर किलिंग केले आहे. यावर कोणत्याही पक्षाच्या आमदाराने भेट दिलेली नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा हरियाणा होईल. कोणत्या तरी मंत्र्यांनी जाऊन शासनाने मदत करायला हवी होती असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

पोलीस खात्यात द्वेष वाढत आहे

पोलिस खात्यात हळूहळू एकमेकांविषयी द्वेष वाढत आहे. आता एडमिनिस्ट्रेशन मध्ये जात शिरताना दिसत आहे. एडमिनिस्ट्रेशनमध्ये जातीचं विष नव्हत ते आता हळूहळू येऊ लागलं आहे. ते होऊ नये असे मुख्यमंत्र्यांनी बघावं असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आता वंजारी आणि मराठा वादाची काहीच गरज नव्हती जी बीड जिल्ह्यात झाली आहे. बीड जिल्ह्याचे गाडी मालक जेव्हा जिल्हा बाहेर गेली की त्यांची गाडी तपासली जात आहे.बीडचा नंबर दिसला की गाडी चेक् केली जाते. हे अन डिक्लेअर ऑपरेशन आहे असे मी म्हणेल असेही आंबेडकर म्हणाले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.