AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्‍यांच्या त्या शब्दांमुळे मी शांत आहे, जरांगे पाटील यांचा गर्भीत इशारा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्‍यांच्या त्या  शब्दांमुळे मी शांत आहे,  जरांगे पाटील यांचा गर्भीत इशारा
| Updated on: Jan 22, 2025 | 2:55 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गर्भीत इशारा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह सहा आरोपींना न्यायालयीने कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देखमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरणातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना सीबीआयने मोक्का लावला आहे. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावेळी सर्व आरोपींनी न्यायालयीने कोठडी मिळाली आहे. बीड प्रकरणातील आरोपींचे नेते आणि दैवत या गुंड टोळीने संपवले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात शब्द दिला आहे. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. अजून खूप तपास बाकी आहे. त्याने खून केला की करायला लावला.. खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत. हे खूप मोठे षड्यंत्र आहे. खोलवर जाऊन तपास करण्याची गरज होती त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती असे जरांगे यांनी म्हटले आहे.

…तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला धोका

मुख्यमंत्री, एसआयटी, सीआयडी, आणि पोलिस प्रशासनाकडून एक आशा आहे ते एकाही आरोपी सुटू देणार नाहीत. या गुंडाचे राज्यात खूप मोठे नेटवर्क आहे. राज्यात खुप मोठी साखळी आहे, ते संपूर्ण बाहेर काढून त्यांना जेल जायला लावले पाहिजे, हे मुख्यमंत्री करतीलच. नाहीतर आम्ही राज्य बंद पाडू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना देखील सह आरोपी केले पाहिजे. सांभाळणाऱ्यांना सह आरोपी करत नाहीत. सरकार यांना पाठीशी घालत आहे का..? खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत आणि यांना कलम 302 लागला पाहिजे, यातील एक जरी आरोपी सुटला तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला धोका आहे, ते या कुटुंबाला मारून टाकू शकतात अशी भीतीही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सर्व समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका

सरकारला आमची एकच विनंती आहे.  खुनाच्या काळात हे कोणत्या कोणत्या मंत्र्यांशी बोलले, हे आणि यांचे सीडीआर समोर यायला पाहिजेत, हे सर्व चार्जशीटमध्ये आले पाहिजे. यांच्या प्रॉपर्टी कुणाच्या नावाने आहे, याबाबत ईडीकडून चौकशी सुरू झाली पाहिजे. खून झाल्यानंतर हे आरोपी कोणत्या मंत्र्यांशी बोलले यांना सहआरोपी केले पाहिजे. एका मंत्र्यासाठी किंवा गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्यासाठी सर्व समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका. आम्ही शांत आहोत, मुख्यमंत्री यांच्या शब्दांमुळे शांत आहोत असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यांचे मोठे नेटवर्क जिल्हा आणि राज्यात आहे ते राहता कामा नये. एकही आरोपी सुटता कामा नये कारण मुख्यमंत्र्‍यांच्या घरी देशमुख कुटुंब आले होते.

२५ जानेवारीला उपोषण

मी येत्या २५ जानेवारीला उपोषणाला बसणार आहे. सरकारने सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे ही आपली मागणी कायम आहे. उपोषण तारीख जवळआल्याने आणि तब्येतीमुळे मी पंढरपूरला जाऊ शकलो नाही. परंतु या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख  हत्या प्रकरणात सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे आदींचा समावेश आहे.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....