AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला मारायला उठले, सुपारी द्यायला लागले… जरांगे पाटलांचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : मला लोक मारायला उठले आहेत, माझ्या हत्येची सुपारी द्यायला लागले आहेत असा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मला मारायला उठले, सुपारी द्यायला लागले... जरांगे पाटलांचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Patil NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 11, 2026 | 10:18 PM
Share

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मला लोक मारायला उठले आहेत, माझ्या हत्येची सुपारी द्यायला लागले आहेत असा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे. तसेच जरांगे पाटलांनी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारीही केली आहे. जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

मला मारायला उठले आहेत, जरांगे पाटलांचा आरोप

मनोज जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मला मारायला उठले आहेत, सुपाऱ्या द्यायला लागलेत, पण मायबाप जनता आहे तो पर्यंत भीती नाही. सरकारच्या तळी उचलणारे म्हणतात आता कोणी सोबत नाही. एकाच गावात येऊन बघ, समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ लागले, सरकारी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. मी त्यांच्यासाठी लढलो मग समाज माझ्या मागे राहील ना.’

मला गोरगरीबांना मोठं करायचं आहे – जरांगे पाटील

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘मी जवळचा एक पण मोठा होऊ दिला नाही म्हणून आरोप होतात. मायबाप विचार करून बघा, मोठे करणे म्हणजे काय? काम द्यायची का, समाजाच्या जीवावर मोठे व्हायचे नाही. मी गरीबांच्या लेकरासाठी काम करतो. समाजाच्या जीवावर दुकानदारी चालवणारे, पैसे कमवणाऱ्यांना का मोठे करायचं? मला गोरगरीबांना मोठं करायचं आहे. ज्यांना जवळ राहून मोठे व्हायचे त्यांनी माझ्या जवळ राहू नये.’

आरक्षण घ्या, लाजू नका

मराठा आरक्षणावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, दोन वर्षात 58 लाख नोंदी दिल्या, सातारा संस्थानाचा आदेश निघणार, नायतर घोडे लावतो. मी मराठे मोठे केले म्हणून माझा सुपाऱ्या देत आहेत. जवळचे लोक फोडून काहीही वदवून घेतात. भंगार जातीला खुश करण्यासाठी आपली जात बदनाम करू नका. शेवटी मदतीला जात येते. पुढे बोलताना जरांगे पाटलांनी व्यसन पासून लांब रहा असा सल्ला तरुणांना दिला. आरक्षणाचा लाभ घ्या, आरक्षण घ्या लाजू नका असे आवाहनही उपस्थितांना केले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...