भारताचे 1000 रुपये फिलिपिन्समध्ये किती होतात? आकडा ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलिपिन्सची राजधानी मनीला येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊयात फिलिपिन्समध्ये भारताचे एक हजार रुपयांचं मूल्य किती आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलिपिन्सची राजधानी मनीला येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपिन्सच्या विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की भारताच्या एक हजार रुपयांची किंमत फिलिपिन्समध्ये किती होऊ शकते? जर भारताचे 1000 हजार रुपये फिलिपिन्समध्ये एक्सचेंज केले तर तुम्हाला त्याबदल्यात किती पैसे मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत, चला तर मग या निमित्ताने जाणून घेऊयात फिलिपिन्समध्ये भारताच्या 1000 हजार रुपयांची किंमत किती होते? कोणतं चलन हे अधिक मजबूत आहे, भारतीय की फिलिपिन्सचं? आणि तुम्ही तिथे एक हजार भारतीय रुपयांमध्ये काय काय खरेदी करू शकता?
सध्याच्या एक्सचेंज रेटनुसार भारताच्या एक रुपयाची किंमत जवळपास 0.677 फिलिपीन पेसो आहे. जसं भारताच्या चलनाला रुपया म्हटलं जातं, तसंच फिलिपिन्सच्या चलनाला पेसो असं म्हटलं जातं. जर तुम्हाला भारतामधील एक हजार रुपये फिलिपीन पेसोमध्ये एक्सचेंज करायचे असतील तर तुम्हाला तिथे एक हजार रुपयांच्या मोबदल्यात 677 ते 677 पेसो मिळू शकतात. एक्सचेंज रेट हा बाजार मूल्यानुसार थोडाफार कमी -जास्त होत राहतो.
तुम्ही तिथे एक हजार रुपयांमध्ये काय-काय खरेदी करू शकतात?
तुम्ही तुमच्याकडे असलेल्या एक हजार रुपयांमध्ये या देशात काय -काय खरेदी करू शकतात, हे असं थेट सांगता येत नाही. मात्र फिलिपिन्समध्ये महागाई प्रचंड आहे. त्यामुळे तुम्ही तिथे एक हजार रुपयांमध्ये फार काही खरेदी करू शकत नाहीत. फार तर फार तेवढ्या पैशांमध्ये तुमची एकवेळच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकते. तसेच तुम्ही त्या पैशांमधून काही जवळपासची ठिकाणं देखील फिरू शकतात. चहा, कॉफी, कोलड्रिंग्स या सारखे पदार्थ खरेदी करू शकतात.
फिलिफिन्सची करन्सी ही भारतापेक्षा अधिक मजबूत आहे. त्यामुळे इथे अनेक भारतीय लोक देखील काम करतात. त्यांना इथे चांगला पगार मिळतो. त्यामुळे बचत देखील मोठ्या प्रमाणात होते. हे लोक सेव्हिंग केलेले पैसे भारतामध्ये कुटुंबाला पाठवतात, समोर आलेल्या माहितीप्रमाणे या देशात वर्क कल्चर देखील चांगलं आहे.
