Shikhar Dhawan : गेल्या चार वर्षांपासून…पहिल्या पत्नीपासून घटस्फोट, लेकाच्या एका भेटीसाठी आसुसलाय प्रसिद्ध क्रिकेटर, सांगितली आपबिती
Shikhar Dhawan : क्रिकेटपटू शिखर धवननं नुकत्याच एका मुलाखतीत लेकाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

माजी क्रिकेटपटू शिखर धवन त्याची पत्नी सोफी शाइनसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. शिखरचं हे दुसरं लग्न असून त्याला पहिल्या लग्नापासून झोरावर नावाचा एक मुलगा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत, शिखरनं आपल्या मुलाबद्दल दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की, तो गेल्या चार वर्षांपासून त्याच्याशी बोलला नाही.
अलीकडेच ‘कर्ली टेल्स’ पॉडकास्टमध्ये, शिखरनं त्याच्या गुरुग्राममधील घर दाखवलं. या संभाषणादरम्यान, शिखरनं सोफीसोबतच्या त्याच्या पहिल्या भेटीबद्दल, त्यांच्या वैवाहिक प्रवासाबद्दल आणि त्यांचा मुलगा झोरावरबद्दल भाष्य केलं. शिखरनं सांगितलं की, सोफीनं त्याच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. ‘सोफीच्या येण्यानंतर सर्व काही बदललं. माझी एक्स पत्नी आयेशापासून विभक्त झाल्यानंतर, जेव्हा मी तीन-चार वर्षे एकटा होतो, तेव्हा मी माझ्या आयुष्याचा खूप आनंद घेतला. पण जेव्हापासून सोफी माझ्या आयुष्यात आली, तेव्हापासून सर्व काही बदललं आहे. माझ्या आयुष्यात स्थिरता आली आहे. माझं रुटीन बदललं आहे. मी आता अधिक शिस्तबद्ध झालो आहे.’
शिखरनं सांगितलं की, त्याची पहिली पत्नी आयेशा मुखर्जीपासून विभक्त झाल्यानंतर त्यानं पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं सोफीलाही आपल्या या निर्णयाबद्दल सांगितलं होतं. शिखर आणि सोफीची पहिली भेट दुबईमध्ये काही मित्रांमार्फत झाली. सोफी म्हणाली की, ती पहिल्या भेटीतच शिखरच्या प्रेमात पडली. सुरुवातीला, भारतात येण्याबद्दल तिच्या मनात शंका होती. पण जेव्हा आयपीएल सुरू झाली आणि शिखर देशाबाहेर प्रवास करू शकत नव्हता, तेव्हा सोफीनं स्वतःहून भारतात येण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
सोफी म्हणाली की, तिला शिखरशी लग्न करायचं होतं, पण शिखर त्यासाठी तयार नव्हता. सोफीनं शिखरवर लग्न करण्यासाठी कधीही दबाव टाकला नाही. शिखर आणि सोफी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर त्यांचा साखरपुडा झाला आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांचं लग्न झालं.
शिखरनं व्यक्त केल्या भावना
मुलाखतीदरम्यान, शिखर आपल्या मुलाबद्दल भावूक झाला. शिखर म्हणाला की, ‘मी अजूनही त्याच्या ब्लॉक केलेल्या नंबरवर मेसेज पाठवतो. तो एक दिवस तो माझ्या आयुष्यात परत येईल, हीच मी देवाकडे प्रार्थना करत. गेल्या चार वर्षांपासून मी त्याच्याशी बोललो नाही किंवा त्याच्याशी कोणताही संपर्क ठेवलेला नाही.’
