AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NAM Live Streaming : भारत-नामिबिया सामन्याच्या वेळेत बदल? मॅच किती वाजता सुरु होणार?

India vs Namibia T20 World Cup 2026 Live Match Score : टीम इंडिया गुरुवारी 12 फेब्रुवारीला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतासमोर या सामन्यात नामिबियाचं आव्हान आहे.

IND vs NAM Live Streaming : भारत-नामिबिया सामन्याच्या वेळेत बदल? मॅच किती वाजता सुरु होणार?
India vs Namibia T20i WC 2026 Live StreamingImage Credit source: @CricketNamibia1 X Account and Bcci
| Updated on: Feb 11, 2026 | 10:04 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात घरच्या मैदानात यूएसएला लोळवत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने 7 फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यूएसएवर मात केली. भारताचा हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सलग नववा विजय ठरला. आता टीम इंडियासमोर आपल्या साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. गेरहार्ड इरास्मस हा या सामन्यात नामिबियाचं नेतृत्व करणार आहे.  तर सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. भारत विरुद्ध नामिबिया हा सामना कधी आणि कुठे होणार? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना गुरुवारी 12 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे बघता येईल?

टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल/लॅपटॉप/टीव्हीव लाईव्ह पाहता येईल.

 टीम इंडिया विरुद्ध नामिबिया 5 वर्षांनी आमनेसामने

भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांची वर्ल्ड कप स्पर्धेतील या सामन्यानिमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघांत पहिला टी 20i सामना हा 2021 मधील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवण्यात आला होता. भारताने तेव्हा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात नामिबियावर एकतर्फी फरकाने मात केली होती. भारताने नामिबियाला 9 विकेट्सने पराभूत केलं होतं.

टीम इंडियाची नवी दिल्लीतील कामगिरी कशी?

दरम्यान टीम इंडियाने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 4 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 2 सामने जिंकलेत, तर तितक्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. आता गुरुवारी होणाऱ्या सामन्यात ब्लु आर्मी नामिबिया विरुद्ध किती मोठ्या फरकाने सामना जिंकणार? याचीच प्रतिक्षा चाहत्यांना आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड